देशातील लोकशाही संपुष्टात आता हुकूमशाही सुरू

0
12

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

देशातील लोकशाही संपुष्टात आली आहे. सरकारी यंत्रणा वापरून हुकूमशाही सुरू झाली आहे. इंग्रजांची सत्ता उलथवणाऱ्या काँग्रेसला थोर स्वातंत्र्य सेनानींचा वारसा आहे. आताची हुकूमशाही उलथवण्यास पुन्हा काँग्रेसच पुढाकार घेईल, यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आवाहन काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या जनसंघर्ष यात्रेच्या पश्चिम महाराष्ट्र यात्रेचा समारोप आज एसएसपीएमएस विद्यालयाच्या मैदानावर झाला. याप्रसंगी गुलामनबी आझाद  बोलत होते. याप्रसंगी काँग्रेस चे नेते मल्लिकार्जुन खर्गे ,प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सोनल पटेल, आशिष दुआ, विधी मंडळातील विरोधीपक्ष नेते बाळासाहेब विखे पाटील, बाळासाहेब थोरात, सचिन साठे, माणिकराव ठाकरे, डॉ. विश्वजित कदम, चारूताई टोकस, हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे, संजय जगताप यांच्यासह पक्षाचे प्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुलामनबी आझाद म्हणाले, महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी मिळवून दिलेली लोकशाही धोक्यात आली आहे. तेव्हाची लोकशाही प्रकियांकडून धोक्यात आली होती . परंतु आता ती आतल्या लोकांकडून धोक्यात आली आहे. सिबीआय , इनकम टॅक्स चा हत्यार , दबावतंत्र म्हणून वापर केला जात आहे. आमच्याकडे लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस असे आदर्श आहेत. त्यांच्याकडे स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या कोणाचा आदर्श आहे. केवळ खोटा प्रचार करून सत्तेत आले आहेत. लोकांना केवळ आश्वासन देऊन फसवणूक केली आहे. देशातील युवक, महिला, शेतकरी, उद्योजक यांना खोट बोलून त्यांचे जीवन उध्वस्त केले आहे.

कश्मीर मधील दहशतवाद आम्ही जवळपास संपुष्टात आणला होता. परंतु आता केवळ सत्तेच्या लालासेपायी पुन्हा दहशतवाद माजलाय. या चार वर्षात सर्वाधिक शस्त्रसंधीचे उल्लंघन झालेय. जवान शहीद होत आहेत. परंतु केवळ निवडणूक आणि परदेशातच पंतप्रधानांचा वेळ जात आहे. त्यांना येथील महिलांची सुरक्षेचे काही देणे घेणे नाही. केवळ धार्मिक दरी वाढवून देशात अराजकता माजवली जात आहे. पेट्रोल, डिझेल चे दर गगनाला भिडले आहेत. यावर उत्तर देणे टाळणारे सर्वात कमजोर पंतप्रधान देशाला लाभले आहेत. अशा भारतीय जनता पार्टीला सत्तेतून घालवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे.

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, मोदी पंतप्रधान झाले तरी काही तरी बदल होईल या अपेक्षेने लोकांनी भाजपला मतदान केले. परंतु त्यांनी निवडणुकीच्या वेळी दिलेले एकही आश्वासन चार वर्षांत पूर्ण केले नाही. मेक इंडिया, स्टार्ट अप इंडियाची घोषणा, 2 कोटी नोकऱ्या, प्रत्येकाच्या खिशात 15 लाख रुपये देऊ अशी अनेक आश्वासने दिली. काय झालंय. एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट अर्थव्यवस्था मोडून टाकली. इंधनाचे दर गगनाला भिडलेत. नोटबंदी करताना दिलेले एकही शब्द खरा ठरला नाही. भ्रष्टाचार बोकाळला आहे. दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. काळा पैसा देशाबाहेर चालला आहे. नोटबंदी च्या वेळी रद्द झालेल्या नोटांपेक्षा अधिक नोटा बाजारात आणल्या आहेत. मोदींच्या चुकीच्या पॉलिसी मुळे पेट्रोलचे दर वाढले आहेत. पेट्रोल मधून टॅक्स च्या नावाखाली गोळा केलेले पैसे घेऊन ललित मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चोकसी फरार झालेत.

संविधान बदलण्याची लोकशाही , सामाजिक न्याय संपुष्टात आणनाऱ्या  भाजपला आताच रोखले नाही तर देशाचे काही खरे नाही. काँग्रेस जनतेसाठी संघर्ष करत आहे. काँग्रेस च्या पाठीशी राहा, असे आवाहन खर्गे यांनी केले.

अशोक चव्हाण म्हणाले, स्मार्ट सिटी पुण्यात रस्ते खड्डेमय, कचऱ्याचे ढीग, वाहतुकीची कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. आम्ही जेएनएनआरयुएम मधून पुण्याचा विकास केला. परंतु पुण्याच्या बहुमतातील सत्तेतून भाजप आमदारांना आता काय खंडणी साठी मर्सिडीज दिल्या जात आहेत. कर्जमाफीची घोषणा झाली, लोकांच्या हाती भोपळा मिळाला.  शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, आता फडनवीसांवर 302 चा गुन्हा दाखल का होत नाही ? असा टोला त्यांनी एकनाथ खडसे यांना लगावला. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? तर खड्डयात घातलाय महाराष्ट्र माझा असा टोला त्यांनी फडणवीस यांना हाणला. आगामी 2 तारखेला गांधी जयंतीच्या दिवशी जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होणार असून त्यावेळी ‘ भाजप चलेजाव’ चा नारा दिला जाणार असल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी प्रदेश महिला काँग्रेस च्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अध्यक्ष चारुलता टोकस, युवक काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम, हर्षवर्धन पाटील, संग्राम थोपटे, रमेश बागवे यांची भाषणे झाली.

इछुकांचे शक्ती प्रदर्शन

जनसंघर्ष यात्रा सभेच्या निमित्ताने शहर आणि जिल्हा काँग्रेसमधील इच्छुकांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन केले. आपापल्या भागातून  भाजप विरोधात घोषणाबाजी करत काँग्रेस कार्यकर्ते सभास्थळी दाखल होत होते. त्यामुळे एसएसपीएमएस परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

भागवतांनी ‘सनातन’ बाबत भुमिका स्पष्ट करावी

सनातन संस्था हिंदुत्वाच्या नावाखाली  युवकांची माथी भडकवून  विचारवंतांची हत्या केली जात आहे. सनातन संस्था म्हणते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आमचे संबंध आहेत. तर संघ म्हणतो आमचा सनातन संस्थेशी संबंध नाहीत. सरसंघचालक मोहन भागवत यांनी सनातन संस्थेबाबतची भुमिका स्पष्ट करावी, असे आव्हान राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिले. .

[amazon_link asins=’B01FXJI1OY,B01MCUSD3L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’90de29b2-b37e-11e8-86d2-697aba6cfc6b’]