देशातील भ्रष्टाचार वाढतोय ! ‘लोकशाही’नंतर आता ‘लाचखोरी’ इंडेक्समध्ये भारताची ‘घसरण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डेमोक्रसी इंडेक्समध्ये 10 वे स्थान गमावल्यानंतर आता भ्रष्टाचाराच्या प्रकरणातही भारताचं स्थान घरसलं आहे. ट्रान्सपरंसी इंटरनॅशनलच्या भ्रष्टाचार अनुभव सूचकांक(सीपीआय) 2019 मध्ये भारताचा जगातील 180 देशात 80 वं स्थान आहे. 2018 मध्ये भारत 78 व्या स्थानावर होता.

ट्रान्सपरंसी इंटरनॅशनलनं दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत या सूचकांकाचा रिपोर्ट जारी केला आहे. या यादीत डेन्मार्क आणि न्युझिलंड अव्वल स्थानावर आहेत. याचा अर्थ हे इमानदारीवाले देश आहेत. जागतिक भ्रष्टाचार धारणा निर्देषांक 2019 च्या 180 देशांच्या यादी पाकिस्तान 120 व्या नंबरवर आहे. डेन्मार्क पहिल्या स्थानावर आहे. या यादीत सर्वात वरती असणं म्हणजे भ्रष्टाचार कमी असणं आहे. या यादीत जो देश जेवढा खाली आहे त्यात भ्रष्टाचार तेवढाच जास्त आहे. बांग्लादेशात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. या यादीत तो 26 गुणांसह 146 व्या स्थानावर आहे. भारताचा स्कोर 41 आहे.

2017 साली 81 व्या स्थानावर आहे भारत
2017 साली या यादीत भारत 40 गुणांसह 81 व्या स्तानावर होता. त्याआधी 2016 साली भारत 79 व्या स्थानावर होता. भारतासोबतच चीन, घाना, बेनिन, मोरक्को हेही 80 व्या नंबर वर आहे. या यादीत फिनलँड, सिंगापूर, स्वीडन, स्वित्झर्लंड, नॉर्वे, नेदरलँड, जर्मनी आणि लक्जमबर्ग या यादीत अव्वल 10 मध्ये आहेत. ही यादी 0 ते 100 पर्यंतच्या गुणांवर आधारावर बनते. 0 गुण असणारा देश सर्वाधिक भ्रष्ट आहे. 100 अंक मिळवणारा देश इमानदार आहे.

दोन तृतीयांश देशांचा स्कोर 50 हून कमी
ग्लोबल करप्शन परसेप्शन इंडेक्स नुसार, दोन तृतीयांश देशांचा स्कोर 50 हून कमी आहे. सरासरी स्कोर 43 आहे. 2012 पासून ते आतापर्यंत केवळ 22 देशांनी भ्रष्टाचार कमी केला आहे. यात एस्टोनिया, ग्रीस आणि गुयाना यांचा समावेश आहे. 21 देशांच्या स्कोरमध्ये घसरण झाल्याची नोंद आहे. यात ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि निकारगुआ यांचा समावेश आहे. ज्या 7 देशांपैकी 4 देशांच्या स्कोरमध्ये घसरण झाली आहे त्यात कॅनडा, फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिका आहे. जर्मनी आणि जपान या देशांच्या स्कोरमध्ये सुधारणा झालेली नाही. इटलीच्या स्कोरमध्ये एका गुणानं सुधारणा झाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –