देश हिंदूमुळे नाही तर संविधानामुळे ‘सेक्युलर’, ओवैसींचा भाजप सरकारवर ‘हल्लाबोल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा विधेयकावर असदुद्दीन ओवैसी यांनी भाष्य केले आहे. यावर बोलताना ओवैसींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला, ते म्हणाले की इतर देशातील अल्पसंख्याक हिंदूंना भारताचे नागरिकत्व देण्याला आमची काहीही अडचण नाही. सरकारला वाटत असेल तर पाकिस्तानातून सर्व हिंदूंना बोलावून त्यांना भारतीय नागरिकत्व देऊ शकते. पण धर्माच्या आधारे सुधारित नागरिकत्व कायदा लागू करणे हे संविधानाच्या विरोधात आहे.

ओवैसी म्हणाले की पंडित नेहरु, बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल आणि राजेंद्र प्रसाद यांच्यापेक्षा जास्त ज्ञान पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना आहे का? या लोकांना देशाचे संविधान बनवले आहे. जे काम या महापुरुषांनी केले नाही ते काम मोदी-शाह करायचा प्रयत्न करत आहेत. या कायद्यानंतर देशभरात अल्पसंख्याकांसोबत भेदभाव केला जाईल. कोणत्या हिंदु आणि मुस्लीमांचे नाव एनआरसी यादीत आढळलं नाही तर हिंदू वाचेल परंतू मुस्लीम वाचू शकणार नाही असा आरोप ओवैसींनी केला.

हिंदूना वाटतं म्हणून देश धर्मनिरपेक्ष नाही असे सांगताना ते म्हणाले की पहिल्यांदा सरकारने एनआरसी लागू करणं गरजेचं होते. आता सरकार देशातील 120 कोटी जनतेला रांगेत उभे करणार आहे आणि त्यानंतर त्यांना त्या कागदपत्रे मागणार. हिंदूंना वाटतं म्हणून देश धर्मनिरपेक्ष नाही. संविधान देशाला सेक्युलर बनवतं. संविधानाच्या अधीन राहून जे निर्णय होतात तसे त्याला आव्हान देण्याचा आधिकार संविधानाने दिला आहे.

मुख्तार नकवी यांनी आणलेल्या विधेयकाचे जोरदार समर्थन केलं तर असदुद्दीन ओवैसींनी सरकारच्या कायद्याविरोधात त्रुटी काढत आहेत. मुख्तार अब्बास नकवी म्हणाले की, देशातील नागरिकांकडे एकही कागदपत्र नाही असं होणार नाही, जे लोक एनआरसीबाहेर झाले त्यांना अपील करण्याची संधी मिळेल. शिवाय सुधारिक नागरिकत्व कायदा हा देशातील नागरिकांसाठी नाही. हा कायदा अफगाणिस्तान, बांग्लादेश, पाकिस्तान या देशातील अल्पसंख्याकांसाठी आहे. त्यामुळे हा कायदा आणि एनआरसी एकत्र जोडू नका.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/