देशातील पहिल्या टेस्ट टय़ूब बेबीचा पुण्यात सन्मान

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
देशातील पहिली टेस्ट टय़ूब बेबी कनुप्रिया अगरवाल आणि तिच्या जन्माबाबत संशोधन करण्यात मोलाचे योगदान देणारे प्रा. सुनीत कुमार मुखर्जी यांचा पुण्यात सन्मान करण्यात आला. कनुप्रिया अगरवाल या आता चाळीस वर्षांच्या झाल्या असून त्यानिमित्त केक कापून त्यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. कनुप्रिया यांनी देखील यावेळी सगळ्यांची उत्सुकता शमवत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३२३४ डी२ च्या वतीने आयोजित या कार्यक्रमात कनुप्रिया यांनी उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5ccfec68-c9f9-11e8-9e11-254de975b715′]

यावेळी कुनप्रिया म्हणाल्या, डॉ. सुभाष मुखर्जी यांनी आयव्हीएफ तंत्र विकसित करण्यासाठी दिलेल्या मौल्यवान योगदानामुळे मी या जगात जन्म घेऊ शकले, मात्र या संशोधनातील नोबेल पारितोषिकासाठी डॉ. मुखर्जी नव्हे तर एका परदेशी शास्त्रज्ञाचे नाव निश्चित करण्यात आले. डॉ. मुखर्जी आणि माझे पालक यांनी धोका पत्करला नसता तर मी हे जग पाहू शकले नसते. त्यामुळे संशोधन करण्यासाठी अनेक तरुण शास्त्रज्ञांनी पुढे येऊन यश किंवा अपयशाची भीती न बाळगता धोका पत्करण्याची गरज आहे. मी स्वतःला जगातील सर्वाधिक भाग्यवान व्यक्ती समजते.

[amazon_link asins=’B01ADAXO36,B015Z7ZQJC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’72a9a4f9-c9f9-11e8-af51-6ba147d6d39e’]

मला आजवर जे प्रेम मिळाले आहे, त्याची तुलनाच होऊ शकत नाही. फक्त, मी माझे वय कधीही लपवू शकत नाही, एवढेच माझ्या मनासारखे झालेले नाही. कनुप्रियाच्या या शेवटच्या वाक्याने सभागृहात हास्याचे तृषार उडाले.

डॉ. खुर्द फर्टिलिटी, आयव्हीएफ सेंटर आणि लायन्स क्लब्ज यांच्या वतीने आयोजित टेस्ट टय़ूब बेबी – समज आणि गैरसमज या कार्यक्रमात अगरवाल यांच्या चाळिसाव्या वाढदिवसानिमित्त त्यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी कनुप्रिया यांच्या जन्माबाबतच्या संशोधनामध्ये महत्त्वाचे योगदान देणारे डॉ. सुभाष मुखर्जी यांच्यासह एंब्रियोलॉजिस्ट म्हणून काम केलेले डॉ. सुनीत कुमार मुखर्जी, महापौर मुक्ता टिळक आणि डॉक्टर उपस्थित होते.

राहुल गांधींच्या रोड शोमध्ये आगीचा भडका