देशाचा चौकीदारच चोर बनला : विखे 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

सध्या आपल्या देशाचा चौकीदारच चोर बनला आहे. तो आणि भाजप मिळून देशाच्या तिजोरीवर दरोडा घालत आहेत. राफेल विमान खरेदी घोटाळ्याबाबत चौकीदार एक शब्दही बोलण्यास तयार नाही. संसदीय समितीमार्फत राफेल विमान खरेदीची चौकशी करावी, अन्यथा काँग्रेस देशभर तीव्र आंदोलन करून केंद्र सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0096f92c-c13d-11e8-b7fa-830355450be2′]

राफेल विमान खरेदी घोटाळा, इंधन दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या निषेधार्थ केंद्र विखे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी विखे बोलत होते. भाजपवर टीका करताना विखे म्हणाले, चौकीदार म्हणणारेच देशाची फसवणूक करत आहेत. पारदर्शकतेचा आव आणून चौकीदार, भाजप व अंबानी स्वत:चे खिसे भरत आहेत. चौकीदार झोपलेला व भ्रष्टाचाराखाली दबला असल्यानेच देशाच्या सीमा असुरक्षित झाल्या आहेत. सर्जिकल स्ट्राईकनंतर सर्वाधिक जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानचे धाडस रोज वाढते आहे. राष्ट्रभक्तीचा गवगवा करणारे याची जबाबदारी स्वीकारणार आहेत का, उलट विमान घोटाळय़ाकडे लक्ष वेधणाऱ्या राहुल गांधींवर भाजपने आरोप सुरू केले आहेत. इंधन दरवाढीने  नागरिक त्रस्त झाले आहेत. यासाठी पेट्रोल, डिझेलचा समावेश जीएसटीमध्ये करावा. महाराष्ट्र सरकारला कर कमी करून इंधनाचे दर किमान १५ ते २० रुपये कमी करणे शक्य आहे, परंतु सरकारचे नागरिकांकडे लक्ष नाही, त्यातून इंधन दरवाढ व महागाईकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, अशी टीकाही विखे यांनी केली.

शास्तीकर वेळेत भरल्यास सवलत योजनेस स्थायी समितीत मान्यता

काँग्रेसच्या मोर्चाला माजी मंत्री अण्णासाहेब शेलार, आ. भाऊसाहेब कांबळे, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, जिल्हाध्यक्ष अण्णा शेलार, महिला जिल्हाध्यक्ष कांचन मांढरे, अंबादास पिसाळ, राहुल झावरे, बाळासाहेब हराळ, निखिल वारे, उबेद शेख, कुलदीप भिंगारदिवे, अभय आव्हाड, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकारविरुद्धचा हा मोर्चा काँग्रेसचा देशव्यापी कार्यक्रम होता, त्यामुळे मोर्चात जिल्हा काँग्रेसमधील नेत्यांचे एकीचे दर्शन घडेल, असे वाटत असताना नगर शहर जिल्हाध्यक्षांसह थोरात गटाचे सर्वच प्रमुख नेते व पदाधिकारी यांनी मोर्चाकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे नगर महापालिकेच्या निवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली पक्षाची बैठकही रद्द करण्यात आली.

[amazon_link asins=’B00I6FS9CC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3adbdafc-c13e-11e8-afdd-35dd321d6116′]