Coronavirus Impact : कोल्हापूरात शिंकला म्हणून बाईकस्वाराला दाम्पत्यानं बदडले

पोलीसनामा ऑनलाईन टीम – राज्यभरात कोरोनाची मोठी दहशत पसरली आहे. त्यामुळे सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेकांकडुन सुरक्षितता बाळगली जात आहे. मात्र, कोरानाच्या दहशतीममुळे कोल्हापुरात शिंकल्यावरुन एका दुचाकीस्वाराला दाम्पत्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

कोरोना व्हायरसचा फटका महाराष्ट्रालाही बसला आहे. आतापर्यंत 49 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्यामुळे कोल्हापुरातील गुजरी गल्लीत दुचाकीस्वार शिंकल्यामुळे दुचाकीवरील दाम्पत्याने त्याला बदडले आहे.

दुचाकीस्वाराला अचानक शिंक आली. त्यामुळे दाम्पत्याने त्याला शिंकलास का, असा जाब विचारत बेदम मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. रुग्णांची संख्या 49 वर पोहोचली आहे. तर देशात कोरोना रुग्णांची संख्या 166 झाली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार उपाययोजना करत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळा, एकाच ठिकाणी जास्त गर्दी करु नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.