लग्न समारंभासाठी भुसावळमध्ये आलेल्या बुलढाण्याच्या दाम्पत्याचा अपघातात मृत्यू

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाइन –  भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी (दि. 4) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास खडका चौफुलीजवळ घडली आहे.

चंद्रकांत जगन्नाथ वराडे (वय 65) आणि संध्या वराडे (55, दोघेही रा. बुलढाणा) असे ठार झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. वराडे दाम्पत्य नातेवाईकाच्या लग्नासाठी ते भुसावळात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.