बोंबला ! झूमवर मीटिंग सुरू असताना कॅमेरा बंद करायला विसरलं जोडपं अन् ‘घडलं-दिसलं’ भलतच

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे अनेक कंपन्यासह सरकारी संस्था बैठका ऑनलाइन घेत आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर बैठकांचे सत्र गेल्या चार पाच महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परंतु , मीटिंग दरम्यान अनावधानाने कॅमेरा सुरू राहिल्यामुळे ब्राझीलमध्ये लज्जास्पद घटना घडली आहे. झूमवर सुरू असलेल्या बैठकीदरम्यान एक कपल कॅमेरा बंद न करताच सेक्स करताना दिसून आले आहे.

ब्राझीलच्या रियो-डी-जेनेरियामध्ये सिटी काऊंसिलच्या बैठकीदरम्यान हा प्रकार घडला. कोरोना महामारीदरम्यान म्युनिसिपल सिस्टमद्वारे विद्यार्थ्यांना खाद्य संरक्षण कसे देता येईल यावर चर्चा सुरू होती. बैठकीत शहरातील काही प्रमुख व्यक्तीही उपस्थित होत्या. या बैठकीदरम्यान एक सदस्य अचानक बैठकीतून बाहेर गेला. परंतु जाताना तो कॅमेरा बंद करण्यास विसरला. त्यावेळी त्यांचे खासगी क्षण कॅमेर्‍यात कैद झाले. सकाळी 10 वाजता ही बैठक सुरू झाली आणि सलग चार तास ही बैठक सुरू होती. बैठकीदरम्यान उपस्थित असलेल्यांनी हा प्रकार पाहून दुर्लक्ष करत चर्चा सुरू ठेवली. आम्ही असा प्रकार घडत असल्याचे पाहिले. त्यानंतर त्वरित ऑडिओ आणि व्हिडीओ कंट्रोल करणार्‍या टीमला फीड बंद करण्यास सांगितले. अशी माहिती बैठकीला उपस्थित असलेल्या सोशलिझम अँड लिबर्टी पार्टीचे नेते लिओनेल ब्रिजोला यांनी दिली आहे.