दुर्देवी ! पती-पत्नीची राहत्या घरात आत्महत्या, फ्लॅटमध्ये मिळून आला 9 महिन्याचा मुलगा

गाझियाबाद : वृत्तसंस्था – उच्चशिक्षीत पती-पत्नीने आपल्या राहत्या घरात वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केल्याची खळबजनक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी दिल्लीजवळ असलेल्या गाझियाबादमधील इंदिपुरमच्या ज्ञान ब्लॉक -1 मध्ये घडली. पत्नी पल्लवीने बेडरुममध्ये तर पती निखिल याने ड्रॉईंग रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानी घराची पाहणी केली असता पोलिसांना नऊ महिन्याचे एक बाळ आढळून आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी पल्लवीने पहाटे चारच्या सुमारास ग्रेटर नोएडामध्ये रहात असलेल्या बहिणीला मेसेज केले होता. या मसेजमध्ये तिने लिहले होते की, घरात बाबू एकटाच आहे येऊन बघ. पोलिसांना घटनास्थळावर कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. या दोघांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलिसांचे एक पथक त्यांच्या आत्महत्येचे कारण शोधत आहेत. निखील हा एका खासगी कंपनी कामाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुलगा घरात एकटा आहे येऊन बघ
पोलिसांनी सांगितले की, निखिल हा नोएडाच्या एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. तर त्याची पत्नी पल्लवी हिने एक वर्षापूर्वी नोकरी सोडली आहे. या दोघांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप समजू शकले नाही. तसे अद्याप कोणतीही सुसाईड नोट न सापडल्याने त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

आत्महत्येपूर्वी दोघांमध्ये भांडण झाले होते का ? त्यांना कोणती अडचण होती का ? अशा अनेक प्रश्न पोलिसांना पडली आहेत. पल्लवीने सकाळी आपल्या बहिणीला मेसेज करून सांगितले होते की, घरी ये बाबू एकटाच आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.