home page top 1

धक्‍कादायक ! बहिणीसह मेव्हण्यावर ‘बेछूट’ गोळीबार, वार करून केले शरीराचे ‘तुकडे-तुकडे’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीची आणि तिच्या नवऱ्याची चुलत भावाने गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र हल्लेखोरांनी तितक्यावरच न थांबता गोळ्या घातल्यानंतर धारधार शस्त्राने पुन्हा त्यांच्यावर वारदेखील केले. ऑनर किलिंगची हि घटना धक्कादायक असून याप्रकरणात चुलत भावासह त्याच्या 8 सहकाऱ्यांचा समावेश आहे.

बहन और जीजा पर बरसाईं गोलियां, टुकड़ों में काट दिया शरीर

नौशहरा ढाला गावातील नरिंदर सिंह यांनी सांगितले कि, त्यांना चार मुले असून यातील सर्वात लहान मुलाने म्हणजेच अमन याने शेजारच्या गावातील अमनप्रीत कौर हिच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर रविवारी तो आपल्या पत्नीसह गुरुद्वारामध्ये गेला होता. आपल्या पत्नीसह गाडीवरून परतत असताना मुलीचा चुलत भाऊ गुरपिंदर सिंह याने त्यांच्या गाडीला टक्कर मारून त्यांना खाली पाडले. त्यानंतर साथीदारांसह आलेल्या गुरपिंदरने त्या दोघांवर अंधाधुंद गोळीबार केला. त्याचबरोबर त्यांच्यावर धारधार शास्त्राने अनेक वार करत त्यांचे तुकडे देखील केले.

बहन और जीजा पर बरसाईं गोलियां, टुकड़ों में काट दिया शरीर

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच गुरपिंदर सिंह आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले कि, गुरपिंदर सिंह हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्या शोधासाठी अनेक ठिकाणी छापेमारी देखील सुरु आहे.

बहन और जीजा पर बरसाईं गोलियां, टुकड़ों में काट दिया शरीर

Loading...
You might also like