बॉयफ्रेन्ड बरोबर सुट्टया ‘एन्जॉय’ करत होती महिला, वेळेच्या 3 महिन्यापुर्वीच बाळानं ‘जन्म’ घेतला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडच्या रहिवासी असलेल्या एका युगुलाला आपल्या सुट्ट्या फार महागात पडल्या आहेत. या प्रेमीयुगुलाला या सुट्टयांदरम्यान मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले असून त्यांच्या मुलाचा जन्म वेळेच्या तीन महिने आधीच झाल्याने त्यांच्या त्रासात अधिकच भर पडली. यामुळे या युगुलाला हॉस्पिटल आणि हॉटेलच्या खर्चापायी अडीच कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. हे युगुल अमेरिकेत सुट्ट्या घालवण्यासाठी आले होते.
बॉयफ्रेंड संग छुट्टी मना रही थी महिला, वक्त से 3 माह पहले बच्चे का जन्म
बॉयफ्रेंड संग छुट्टी मना रही थी महिला, वक्त से 3 माह पहले बच्चे का जन्म
इंग्लंडच्या लिन्कोल्नशायरचे रहिवासी लुइस बोरिल आणि येरिदिआना चाजारेस हे अमेरिकेत सुट्ट्या एन्जॉय करत होते. मात्र एक दिवस अचानक येरिदिआना हिची प्रकृती खराब झाली. त्यानंतर तिला दवाखाण्यात दाखल करण्यात आल्यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला. मात्र तीन महिने आधीच या मुलीचा जन्म झाल्याने तिला पुढील तीन महिने हॉस्पिटलमध्येच ठेवावे लागणार आहे. त्यामुळे ती आपल्या देशात देखील जाऊ शकणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार,या संपूर्ण कालावधीत राहण्याचा आणि हॉस्पिटलचा खर्च मिळून जवळपास अडीच कोटी रुपये खर्च येणार आहे.
बॉयफ्रेंड संग छुट्टी मना रही थी महिला, वक्त से 3 माह पहले बच्चे का जन्म
दरम्यान, या युगुलाकडे विमा नसल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये मोठी रक्कम भरावी लागणार आहे. त्यासाठी त्यांनी एका कॅम्पेन सुरु केले असून ते आपल्या मदतीसाठी पैसे मागत आहेत. आतापर्यंत त्यांना दोन लाख रुपये मिळाले असून इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम गोळा करणे अवघड आहे.
बॉयफ्रेंड संग छुट्टी मना रही थी महिला, वक्त से 3 माह पहले बच्चे का जन्म

आरोग्यविषयक वृत्त –