हायवेवर धावत्या कारमध्ये कपलचं चालू होतं ‘सेक्स’, रॅश ड्राव्हिंग म्हणून लायसन्स केलं ‘बॅन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्पेनच्या विलकास्टिन शहरात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथील एका जोडप्याला चालत्या कारमध्ये शरीरसंबंध बनवतानाच्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने या जोडप्याला 6 महिन्यांची शिक्षा सुनावली असून दोन वर्ष त्यांना गाडी चालावण्यवास देखील बंदी घातली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शेजारी जाणाऱ्या गाडीतील व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या जोडप्याचा शोध घेऊन त्यांना या प्रकरणात अटक केली होती. पोलिसांच्या तपासात त्यांनी बेदरकारपणे गाडी चालवण्याच्या गुन्ह्याची कबुली दिली होती.

बेदरकारपणे गाडी चालवून रस्त्यावरील इतर नागरिकांचा देखील जीव धोक्यात घालण्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. दरम्यान, त्यानंतर न्यायालयात देखील त्यांनी आपला गुन्हा कबुल केल्याने न्यायालयाने त्यांना या प्रकरणात 6 महिन्यांची शिक्षा सुनावली. मात्र सध्या त्यांना कोठडीत पाठवण्यात येणार नसून या शिक्षेवर त्यांना स्थगिती मिळाली आहे.

Visit : Policenama.com