home page top 1

पतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कौटूंबिक कलहाने संपूर्ण कुटूंबालाच आपला जीव गमवावा लागला. पहिल्यांदा पतीने पत्नीचा सुऱ्याने गळा कापला, त्यानंतर स्वत:च स्वत:च्या पोटात सुरा भोसकून आत्महत्या केली. ही हृदय हेलावून टाकणारी घटना दिल्लीच्या प्रल्हादपूर भागात घडली. बुधवारी घरात नवरा, बायकोचा मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली.

दोघांच्या शरीरावर चाकूने वार केल्याचे निशाण आहे. पत्नीचा गळा चाकूने कापला होता तर पतीच्या पोटात चाकू खुपसल्याचे निशाण होते. दरवाजा आतून बंद होता. पोलिसांचा संशय आहे की पहिल्यांदा पतीने पत्नीची चाकूने हत्या केली आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. सांगण्यात येत आहे की या दोघांत वाद झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचे 8 वर्षापूर्व लग्न झाले होते. त्यांना 5 वर्षांचा मुलगा देखील आहे. लग्नानंतर दोघांत सतत वाद होत होते. परंतू रोज होणाऱ्या या वादांमुळे रागाच्या भरात आकाशने हे पाऊल उचलले. आकाश आपल्या पत्नीवर संशय देखील घेत असतं आणि घरात वादाचे हेच कारण असू शकते. आता आकाशचे कुटूंबीय देखील या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.

सध्या पोलीस संबंधित घटनेचा तपास करत आहे आणि शोधत आहेत की अखेर आकाशने असे पाऊल का उचलले.

Visit : Policenama.com

 

Loading...
You might also like