हॉटेलवर छापा टाकताच प्रेमी युगुलांची ‘पळापळ’, 8 मुले अन् 7 मुली ताब्यात

बरेली/उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकताच हॉटेलमधील प्रेमीयुगलांची चांगलीच पळापळ झाली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 15 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई सॅटेलाईट परिसरातील हॉटेलवर करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी अभियंता आणि शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये छापा टाकल्यानंतर पकडण्यात आलेले प्रेमी युगुल असल्याची माहिती समोर आली. सर्वजण विविध शहरांमध्ये राहणारे आहेत. चौकशीदरम्यान तीन मुली शिक्षीका, एक डॉक्टर आणि एक अभियंता असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच इतर युवक देखील उच्च शिक्षित असून दोनजण सरकारी नोकरी करत असल्याचे समजतेय.

पोलिसांनी या कारवाईत 15 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये हॉटेलचा व्यवस्थापक राकेश व व्ही.के. गुप्ता यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या युवक-युवतींच्या नातेवाईकांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.