7 हजारामध्ये खरेदी केली होती कार, 7 कोटी रूपयांना विकल्याने ‘मालामाल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रसिद्ध अमेरिकन कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्कने खुलासा केला आहे की नुकतीच कंपनीतर्फ लॉंच करण्यात आलेली साइबरट्रकचे डिझाइन हे जेम्स बॉण्डच्या चित्रपटापासून प्रेरित आहे. 1977 मध्ये प्रदर्शित झालेला जेम्स बॉण्डचा चित्रपट ‘द स्पाय हु लव्ह मी’ मध्ये एक अशाच प्रकारची कार दाखवण्यात आलेली आहे. जी की फक्त रस्त्यावरच नाही तर पाण्यावर देखील चालते. मिळालेल्या माहितीनुसार यावेळी चित्रपटात वापरण्यात आलेली कार 7 कोटी 15 लाख रुपयांना एलन मस्क ने विकत घेतली होती. जाणून घेऊयात या कारची नेमकी कहाणी.

नोव्हेंबरमध्ये टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी सायबेरट्रक नावाच्या लाइट कमर्शिअल गाडीची डिजाइन सादर केली. बॅटरीवर चालणाऱ्या सायबरट्रकची किंमत सुमारे 29 लाख रुपयांपासून सुरू होते. 2021 पासून त्याची विक्री सुरू होईल. पण बुकिंग 7 हजार रुपयांपासून सुरू झाले आहे.

सायबर ट्रक या डिझाईनमध्ये मदत ज्या कारकडून मिळाली आहे त्याला जोडप्याने फक्त 7 हजार रुपयांमध्ये खरेदी केली. पण ते जेम्स बाँड यांच्या चित्रपटाचे प्रेक्षक नव्हते. त्यामुळे सुरुवातीला त्यांना या कारचे महत्त्व माहित नव्हते.

मिळालेल्या माहितीनूसार, न्यूयॉर्कच्या लाँग आयलँडमधील रहिवासी असलेल्या जोडप्याने 1989 मध्ये स्टोरेज युनिट खरेदी केली. हा एक लिलाव होता. जेव्हा या जोडप्याने 7 हजारांमध्ये विकत घेतलेला स्टोरेज युनिट खोलले तेव्हा त्यांना 1976 ची ‘Lotus Esprit’ स्पोर्ट्स कार सापडली. 1977 मध्ये जेम्स बाँड यांचा चित्रपट ‘The Spy Who Loved Me’ही कार वापरली होती.

जेम्स बाँडच्या ‘The Spy Who Loved Me’ या चित्रपटात एकूण आठ कार वापरण्यात आल्या. पण फक्त एक गाडी पाण्याखाली वापरली गेली. तीच कार अमेरिकन जोडप्यांना स्टोरेज युनिटमध्ये सापडली. नंतर जेव्हा कपलला सत्य कळले तेव्हा त्यांनी हा चित्रपट पाहिला.

‘The Spy Who Loved Me’ या चित्रपटामध्ये कार पाण्याखाली पोहण्याची क्षमता असल्याचे दर्शविले आहे. एवढेच नाही तर पाण्याखाली जाऊन कार गोळीबार ही करताना दिसते. कारची खरी माहिती मिळाल्यानंतर देखील त्या जोडप्याकडे 20 वर्षांसाठी एक कार होती. शेवटी 2013 मध्ये त्यांनी या कारचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. RM Sotheby नावाच्या कंपनीच्या एका अज्ञात व्यक्तीने ही कार विकत घेतली तीही 7 कोटी रुपयांना. नंतर ती अज्ञात व्यक्ती एलन मस्क असल्याचे समोर आले.

Visit : policenama.com