सलग 3 वर्ष चाललं प्रेमप्रकरण, पोलिस ठाण्यात झाला ‘निकाह’, काही तासातच उतरलं प्रेमाचं ‘भूत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारमधील बेगुसरायमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 25 वर्षीय महिलेला एका ठेकेदाराने लग्नाचे अमिश दाखवत तीन वर्ष शारीरिक शोषण केले. त्यानंतर ती गर्भवती राहिल्याने तिचा गर्भपात देखील करण्यात आला. येथील एका 25 वर्षीय महिलेचा 2016 मध्ये आपल्या पतीशी घटस्फोट झाला होता.

त्यानंतर तिच्या गावातील ठेकेदार मोहम्मद परवेज याने तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण करून तिला लग्नाचे आमिष दाखवत तिचे शारीरिक शोषण केले. त्यानंतर ती महिला गर्भवती राहिली असता तिला डॉक्टरकडे नेण्यात आले. तसेच तिचा गर्भपात करण्यात आला. मात्र तिची स्थिती नाजूक झाल्याने हे प्रकरण पोलिसांकडे गेले. मात्र त्यानंतर पंचांच्या उपस्थितीत त्या दोघांचे लग्न लावून देण्यात आले. मात्र लग्नांनंतर देवल त्याने महिलेला आपल्या घरात ठेवण्यास तयार नाही.

पंचांच्या समोर विवाह केल्यानंतर ती आपल्या सासरी गेली असता तिला मारहाण करत घरातून हाकलून देण्यात आले. त्यानंतर तिने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असता पोलीस देखील कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप तिने केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी कौटुंबिक हिंसा प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Visit : policenama.com