Couple Marry on Zoom Call | फेसबुकवर झाली भेट, व्हिडिओ कॉलवर केले प्रपोज; झूमवर केले लग्न! जोडप्याच्या ऑनलाइन नात्याने केले सर्वांनाच ‘हैराण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Couple Marry on Zoom Call | शिक्षण, नोकरी, ऑफिसच्या मीटिंग, नातेवाई-मित्रांच्या भेटीगाठी, महतवाची कामे आणि सर्वकाही ऑनालाइन होत आहे. आता प्रेमसुद्धा ऑनलाइन होऊ लागले आहे. अलिकडेच एका जोडप्याने (Couple Marry on Zoom Call) केलेल्या लग्नाची मोठी चर्चा सुरू आहे, ज्यांच्या डिजिटल नात्याने (Digital Relationship) सर्वांना हैराण केले आहे.

 

हैराण करणारी बाब म्हणजे हे जोडपे एकमेकांना कधीही भेटलेले नाही आणि त्यांनी एकमेकांशी लग्न केले.
ब्रिटनच्या लॅकेस्टर (Lanchester, Britain) मध्ये राहणारी 26 वर्षांची आयसी (Ayse) मागच्या वर्षीच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये
खुप कंटाळली होती तेव्हा तिने एक फ्रेंडशिप करणारा फेसबुक ग्रुप जॉईन केला.
या फेसबुक ग्रुपमध्ये तिची भेट अमेरिकेच्या डेट्रॉइट (Detroit, USA) मध्ये राहणार्‍या 24 वर्षाच्या डॅरिन (Darrin) सोबत झाली.
दोघांनी चॅटिंगने सुरूवात केली आणि हळु-हळु व्हिडिओ कॉलवर बोलू लागले.

व्हिडिओ कॉलवर डॅरिनने आयसीला केले प्रपोज

 

व्हिडिओ कॉलिंग सुरू झाल्यानंतर डॅरिनने याच वर्षी मेमध्ये आयसीला प्रपोज (Proposal on Video Call)
करण्याचा निर्णय घेतला व्हिडिओ कॉलवरच त्याने गुडघ्यांवर वाकून आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले.
आयसीने हो म्हटले आणि नंतर तिला समजले की, प्रपोज करण्यापूवी त्याने आपल्या वडिलांशीही चर्चा केली होती. यामुळे ती आणखी खुश झाली.

 

झूमवर झाले लग्न

 

दोघांनी याच वर्षी झूम कॉल (Couple Marriage on Zoom Call) वर अधिकृतपणे लग्न केले. अजूनपर्यंत दोघे एकमेकांना भेटलेले नाहीत.
आयसीने डॅरिनच्या चेहर्‍यावर चेहर्‍याचे एक सॉफ्ट टॉय सुद्धा बनवले आहे, ज्यामुळे तिला वाटावे की डॅरिन तिच्या जवळ आहे.
आयसीचे म्हणणे आहे की, कोरोनामुळे दोघांना भेटता येत नाही. परंतु यामध्ये दोघांचेच भले आहे.
जेव्हा ते एकत्र येतील तेव्हा मोठी पार्टी करणार आहेत.

 

Web Title : Couple Marry On Zoom Call | meet on facebook propose on a video call and Couple Marry On Zoom Call

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maoist Prashant Bose | एक कोटीचे बक्षीस असलेला नक्षली प्रशांत बोसने केले धक्कादायक खुलासे, रचला होता PM मोदी यांच्या हत्येचा कट

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 912 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

IBPS Recruitment 2021 | आईबीपीएस तर्फे तब्बल 1828 जागांसाठी मेगा भरती; जाणून घ्या