अभिनेता शाहिदने शेअर केले लग्नाचे ‘Unseen’ फोटो ! चाहते ‘चकित’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड इंडस्ट्रीतील लव्हिंग कपलमध्ये शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचं नाव नेहमी येतं. शाहिद आणि मीरा नेहमीच आपले क्युट आणि रोमँटीक फोटो सोशलवर शेअर करत असतात. सध्या त्यांचे असेच काही अनसीन फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहेत. हे फोटो या कपलच्या लग्नाच्या थ्रोबॅकचे फोटो आहेत. हे फोटो याआधी कधीच समोर आलेले नव्हते त्यामुळे चाहतेही चकित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार यातील काही फोटो शाहिद आणि मीराच्या संगीत सेरेमनीचे आहेत. यात शाहिद खूपच स्मार्ट दिसत आहे. मीरा राजपूतही खूप गॉर्जस दिसत आहे. कपल डान्स करताना खूपच आकर्षक दिसत आहे.

शाहिद आणि मीराच्या लग्नाबद्दल सांगायचे झाले तर दोघांनी 7 जुलै 2015 रोजी लग्न केलं होतं. दिल्लीत हा लग्नसोहळा पार पडला होता.

शाहिदच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच शाहिद साऊथ मुव्हीच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. याशिवाय तो जर्सी या तेलगू सिनेमातही काम करताना दिसणार आहे. 28 ऑगस्ट 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Visit : Policenama.com