हॉटेलमध्ये लव्हबर्डचे सुरू होते अश्लील चाळे, पोलिसांनी नको त्या अवस्थेत पाहिलं अन्…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – नववर्षाच्या पार्टीच्या नावाखाली अश्लील चाळे करताना १७ प्रेमी जोडप्यांना मेरठ जनपदमधील मोदीपूरम परिसरातील रुडकी रोडवरील एका हॉटेलमधून पोलिसांनी छापा मारत ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेताना हे तरुण-तरुणी आक्षेपार्ह स्थितीत होते. पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शांती निकेतन कॉलनीच्या लोकांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला हॉटेलमध्ये गैरकाम सुरु असल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा मारत हॉटेलमधील खोल्यांचा तपास केला असता, तेथे अनेक जोडपे आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी याप्रकरणी १० तरुण आणि ७ तरुणींना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांना खोलीत दारुच्या बाटल्या आणि आक्षेपार्ह वस्तू सापडल्या आहेत. त्यातील काही तरुण मद्यपान केलेले होते. परिसरातील लोकांनी हॉटेल मालकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. हॉटेलमध्ये सापडलेले प्रेमी जोडपी वयस्क असून, त्यांची चौकशी सुरु आहे. सर्वांच्या कुटूंबीयांना याबद्दल कळवण्यात आले आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी दिग्विजय नाथ शाही यांनी दिली. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे.