धक्कादायक ! प्रेयसीच्या आत्महत्येनंतर ‘अशी’ सुसाईड नोट लिहून प्रियकराची आत्महत्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – ‘सॉरी आई, सॉरी बाबा…मी स्वत:ला सांभाळण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र सांभाळू शकलो नाही. मी तिच्याच जवळ चाललोय,’ अशी सुसाईड नोट लिहून नागपूरच्या १९ वर्षाच्या सम्यक मेश्राम या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सम्यक याच्या मैत्रिणीने ५ एप्रिल रोजी आत्महत्या केली होती. त्यामुळे निराश झालेल्या सम्यकने हे पाऊल उचलले.

याबाबत नागपूर पोलिसांनी सांगितले की, सम्यक हा बी कॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. सम्यक याची एका तरुणीबरोबर मैत्री होती. त्यांच्यात किरकोळ कारणावरुन काही दिवसांपूर्वी भांडणे झाले होती. त्यातून त्या तरुणीने ५ एप्रिल रोजी तिच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या तरुणीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सम्यकविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सम्यक याला अटकही केली होती. याप्रकरणात सम्यक याला जामीन मिळाल्यानंतर त्याची सुटका झाली होती. तरीही तो तिच्या आठवणीने खचून गेला होता. ११ मे रोजी त्याचे वडिल कामाला गेले. आई आणि धाकटी बहिण बाहेर गेले होते. हे पाहून सम्यक याने बेडरुममध्ये गळफास घेऊन स्वत:ला संपविले.

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आईवडिलांकरीता एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्याने आईवडिलांची माफी मागून म्हटले की, सॉरी, आई बाबा, मी स्वत:ला सावरण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, स्वत:ला सांभाळू शकलो नाही. ती जेव्हा मृत्युशी संघर्ष करत होती. अखेरचा श्वास घेत होती. तेव्हाही मी तिला साथ देऊ शकलो नाही. म्हणून मी तिच्याजवळ जात आहे.
या घटनेने सम्यकच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

Loading...
You might also like