प्रेमीयुगुलाची आत्महत्या : शेवगावात कुजलेल्या अवस्थेतील दोघांचे मृतदेह सापडले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शेवगाव तालुक्यातील हिंगणगाव येथील प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आज दोघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेतील आढळून आले आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगावपासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या हिंगणगाव येथील संपत मिसाळ यांच्या विहिरीमध्ये युवक व युवतीचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. शेवगाव पोलीस स्टेशनला दोन दिवसापूर्वी एका ४० वर्षीय महिलेने आपली १६ वर्षीय मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती. मुलीच्या घरच्यांनी तिचा इतरत्र शोध घेतला असता ती सापडली नाही. त्यांच्या शेजारी राहणारा राजेंद्र शिंदे (२५) हादेखील दोन दिवसापासून गावातून बेपत्ता असल्याचे समजले होते. तिच्या आईच्या फिर्यादीवरून गुरुवारी शेवगाव पोलिसांनी राजेंद्र शिंदे याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

सोमवारी दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत एकाच विहीरत सापडले. त्यामुळे प्रेमसंबंधातून ही आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्याठिकाणी क्रेनच्या मदतीने विहिरीत गावकऱ्यांनी उतरून दोन्ही मृतदेह विहिरीबाहेर काढले.

Loading...
You might also like