बालकाच्या अपहरण प्रकरणी दाम्पत्यास जामिन 

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – भिक मागण्याचा उद्देशाने बालकाचे अपहरण करण्याची घटना ८ जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात मनोज उर्फ लखन चव्हान व चंदा उर्फ माया मनोज चव्हान या पती-पत्नी विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नरेदर मुबरानी बागडी  (सजावा, राज्यस्थान) यांनी फिर्यादी दिली होती. सदर प्रकरणात पोलिसांनी अरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते.

पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्हि. एस. कुलकर्णी यांनी सदर प्रकरणात दोघांना पंधरा हजार रूपयाच्या जामिनावर सोडण्याचे आदेश केले आहेत. तसेच साक्षीदारावर दबाव टाकायचा नाही, कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जायचे नाही आदी अटी शर्तीवर जामिन मंजूर केला आहे. अरोपीच्या वतीने अ‍ॅड. श्रीकृष्ण घुगे, अ‍ॅड. प्रझा उबाळे, अ‍ॅड. दयानंद लोंढे, अ‍ॅड. तेजल पुराणिक व रश्मी रंगारी यांनी काम पाहिले. अ‍ॅड. श्रीकृष्ण घुगे यांनी अरोपीला सदर मुल सापडले होते व स्वत: ते मुलांचे आईवडीलांचा शोध घेत होते. अपहरण करण्याचा अरोपीचा हेतू नसल्याचा व आरोपीने पोलिसांना स्वतः मुलास दिल्याचा युक्तीवाद केला. सदर युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला जामिन मंजूर केला आहे.