खळबळजनक ! विष पिऊन दाम्पत्याने केली आत्महत्या, वसईतील घटना

पोलीसनामा ऑनलाईनः एका दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वसई पूर्वेकडील भोयदापाडा येथे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. वालीव पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

कृष्णा पटेल (वय 32) आणि प्रभाती पटेल (वय 30) असे आत्महत्या केलेल्या दामप्त्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पटेल दाम्पत्य हे वसईच्या पूर्वेकडील भोयदापाडा येथील मराठी शाळेजवळ राहत होते. या दोघांना दोन वर्षांचा एक मुलगा असल्याचे समजते. हे दोघेही घरामध्ये पडलेल्या अवस्थेत आढळल्यावर आजूबाजूच्या लोकांनी त्यांना वसईच्या महानगरपालिकेच्या सर डी.एम. पेटिट रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण, प्रभाती हिचा उपचाराआधीच मृत्यू झाला, तर पती कृष्णा याला उपचारासाठी दाखल केले. त्याचा बुधवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अहवाल आल्यावरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी सांगितले.