लासलगाव जवळ कामाख्या मुंबई LTT एक्सप्रेसची कपलिंग तुटली

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – कामाख्या हुन सुटणारी मुंबई येथे जाणारी कामाख्या मुंबई एलटीटी वातानुकूलित सुपरफास्ट एक्सप्रेसची (०२५२०) मनमाड रेल्वे स्थानक सोडल्यानंतर समिट आणि लासलगावच्या रेल्वे स्थानकाच्या दरम्यान दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास कपलिंग तुटल्याची घटना घडली. या दुर्घटनेत कुठलीही वित्त आणि जीवितहानी सुदैवाने घडली नाही.

याबाबत रेल्वे सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कामाख्या हुन सुटणारी मुंबईच्या दिशेने जाणारी कामाख्या मुंबई एलटीटी वातानुकूलित २० बोगीं असलेली सुपरफास्ट एक्सप्रेसची (०२५२०) ला दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होत असताना दोन बोगींना जोडणारी कपलिंग तुटल्याने अपघात झाला. वीस बोगीच्या वातानुकूलित एक्स्प्रेस असलेल्या दोन बोगीं मधील कपलिंग तुटल्याने सदर घटना घडली. कपलिंग तूटल्याची घटना माहिती झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती.

कपलिंग तुटल्यानंतर बोगयांमध्ये एक ते दीड किलोमीटरचा अंतर पडलेला होता. गाडीचा वेग मंदावल्याचे रेल्वे गार्डच्या लक्षात आले. याबाबत रेल्वे विभागाशी संपर्क होताच एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर कपलिंगला जोडण्यात यश आले. या दुर्घटनेत कुठल्याच प्रकारची जीवीत व वित्तहानी झालेली नसल्याने रेल्वे प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.