धारदार शस्त्राने सपासप वार करून ‘त्या’ कुरीअर चालकाचा खून

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – उधारीच्या पैशाच्या कारणावरुन चौघांनी कुरीअर चालकावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन त्याचा खुन करण्याची घटना समोर आली आहे. वासुदेव त्र्यंबक डांगे (वय ५२, रा. हनुमाननगर) असे या कुरीअर चालकाचे नाव आहे. ही घटना शहरातील नवीन बी. जे. मार्केट परिसरात मंगळवारी रात्री १० वाजता घडली. पोलिसांनी तातडीने कारवाईवरुन खुन करणाऱ्या तिघांना पकडले आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, वासुदेव डांगे आणि राजू न्हावी, यांच्यात उधारीच्या पैशांवरुन वाद होता. मंगळवारी रात्री राजू न्हावी याने डांगे यांना फोन करुन बी. जे. मार्केट परिसरात बोलावून घेतले. डांगे तेथे आल्यावर पैसे देण्यावरुन त्यांच्यात पुन्हा वाद झाला. तेव्हा चौघांनी डांगे यांना बेदम मारहाण केली. जबर जखमी झालेल्या डांगे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाला.

याप्रकरणी पोलिसांनी राजू न्हावी, ईश्र्वर माळी, नीलेश बाविस्कर या तिघांना अटक केली आहे. सतीश भोपाळे हा फरार झाला आहे.

You might also like