टेम्पल रोझ प्रकरणी पोलिसांनी आरोपींना संरक्षण दिल्याचा निष्कर्ष

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गुंतवणूकदारांना भूखंड आणि आकर्षक परतावा देण्याची भुरळ पाडून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात टेम्पल रोझ रिअल इस्टेट कंपनीचा लेखा परीक्षक धर्मेश नरेंद्र जोशी आणि शर्मिला या त्याच्या एजंट पत्नीचा अटकपुर्व जामीन न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. तर सत्र, उच्च, आणि सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळलेला असतानाही पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्य दाखवले नाही. याउलट त्यांनी आरोपींनाच संरक्षण दिल्याचं दिसून येत असल्याचा निष्कर्ष यातून निघतो असे म्हणत न्यायालयाने पोलिसांना फटकारलं.

पुरंदर तालुक्‍यातील पिंगोरी गावात असलेल्या 440 एकरमध्ये भूखंड देण्याचे अमिष रोझ कंपनीच्या माध्यमातून दाखवून नागरिकांना तब्बल 300 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गंडा घालण्यात आला. यातील मुख्य आरोपी देविदास सजनानी याच्यासह अन्य आठ जणांवर गुन्हा याप्रकऱणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोशी दांपत्याने अटकपूर्व जामीनासाठी केलेल्या अर्जाला सहायक जिल्हा सरकारी वकील सुनील हांडे यांनी विरोध केला. 300 कोटी रुपयांहून अधिक फसवणूक झाली असल्याची माहिती फॉरेन्सिक ऑडीटमध्ये समोर आली आहे. या टेम्पल रोझशी संबंधित सर्व कंपन्यांचे लेखा परिक्षण जोशी याने पाहिले आहे. त्याची पत्नी एजंट होती. तिला कोणतीही नोकरी नसताना ३ कोटी २८ लाख ४१४ रुपयांचा भत्ता मिळाला आहे. सखोल चौकशी करण्यासाठी दोघांना अटक करणे गरजेचे असल्याचा युक्तीवाद ऍड. हांडे यांनी केला अफरातफराची रक्कम मोठी आहे. ती परत मिळालेली नाही. फॉरेन्सिक ऑडीटनुसार आरोपींचा रोल दिसून येत असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us