अनिकेत कोथळे खून प्रकरणातील आरोपींचा जामीन फेटाळला

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

 

अनिकेत कोथळे खून प्रकरणातील संशयित आरोपींचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाला. खून प्रकरणातील संशयित आरोपी झिरो पोलीस झाकीर नबीलाल पट्टेवाले व वाहन चालक राहुल शिंगटे यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांनी जामीन अर्ज फेटाळला. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम व त्यांना सहाय्यक म्हणून जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी काम पाहिले.

संशयित आरोपींनी खटल्यातील कागदपत्रे मिळावी यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने हा देखील अर्ज फेटाळला. झाकीर पट्टेवाले व राहुल शिंगटे याच्यासह 7 संशयितांविरुध्द यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानंतर पट्टेवाले व शिंगटे यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.
[amazon_link asins=’B078LVWLJX,B075T1YTR9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f04bb677-a55f-11e8-b30f-1d8238f2444d’]
तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. सरकारपक्षाच्यावतीने पुरवणीत आरोपपत्र दाखल केले जाणार आहे.संशयितांना जामीन दिल्यास ते साक्षीदारांवर दबाव आणून तपास कामात अडथळे आणू शकतात, असे मत नोंदवत न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. तसेच तपासकामात असलेल्या कागदपत्रांच्या प्रती बचाव पक्षाला देता येतील. परंतु तपासाव्यतिरिक्त गैरअनुषंगिक कागदपत्रे देता येणार नसल्याचा निर्णय न्यायाधीशांनी दिला.

पोलिसांनी या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक युवराज बजरंग कामटे, हवालदार अनिल श्रीधर लाड, अरुण विजय टोणे, नसरुद्दीन बाबालाल   मुल्ला, गाडीचालक राहुल शिवाजी शिंगटे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल या पाच पोलिसांसह एकूण 11 जणांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना निलंबित करण्यात आले.