अनैतिक संबंधातुन प्रेयसी, मैत्रीणींची मदत घेत पत्नीचा ‘मर्डर’ ; प्रेत घरात पुरणार्‍या पतीसह चौघांना जन्मठेप

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अनैतिक संबंधाची पत्नीला चाहूल लागल्यानंतर तिने माहेरी सांगितले. त्याचा राग आल्याने पतीने प्रेयसी आणि तिच्या मैत्रीणींच्या मदतीने पत्नीचा खून करून तिचा मृतदेह खड्डयात पुरला. याप्रकरणी न्यायाधीश व्ही.जी. मोहिते यांनी पती, त्याची प्रेयसीसह चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर त्यांना गुन्हयात मदत करणार्‍यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पती नरहरी रामदास श्रीमल (३५, रा. श्रीरामनगर, सोलापूर), प्रेयसी विनोदा नागनाथ संदुपटला (३३), प्रेयसीच्या मैत्रीणी महादेवी बसवराज होनराव (३५) आणि अंबुबाई भीमराव कनकी (३८, सर्व रा. कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर बालाजी दत्‍तात्रय दुस्सा (२३), अमर श्रीनिवास वंगारी (२५), नरेश अंबादास मंत्री (२२) आणि अंबादास किसन ओत्‍तूर (२१, सर्व रा. विनायकनगर, कुंभारी) यांना खुनाचा कट आणि खुनाचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ५ वर्षाच्या सक्‍त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, नरहरी श्रीमल आणि विनोदा संदुपटला यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते. दोघांमध्ये असलेल्या संबंधाबाबत पत्नी प्रवलिका माहिती झाले. त्यानंतर प्रवलिका यांनी नरहरीने केलेल्या प्रतापाची माहिती माहेरच्या लोकांना दिली. त्याचा नरहरीला प्रचंड राग आला. नरहरीने तिचा काटा काढण्यासाठी तिला देवदर्शनाला घेवुन जाण्याचा बहाणा करत तिला मोटारसायकलवरून प्रेयसीची मैत्रीण अंबुबाई हिच्या घरी नेते. तेथे प्रेयसी विनोदा आणि तिची दुसरी मैत्रीण महादेवी होनराव पुर्वीपासुच नरहरी आणि त्याच्या पत्नीची वाट पहात होत्या. सर्वप्रथम नरहरीने प्रवलिकाला खाली पाडले. त्यानंतर अंबुबाईने तिचे पाय पकडले तर विनोदाने तिला फास दिला. महादेवी ही प्रवलिकाच्या अंगावर बसली होती. क्रुरपणाचा कळस करीत नरहरीने स्वतःच्या पत्नीच्या मानेवर लाथा घत्तलत तिचा खून केला. एवढयावरच न थांबता नरहरी आणि इतरांनी प्रवलिकाचा मृतदेह निळया बॅरलमध्ये टाकले. एका वाहनातुन त्यांनी तिचे प्रेत विनोदाच्या घरी नेले. तिच्या घराच्या कंपाऊंडमध्ये खड्डा करून ते प्रेत तेथे पुरण्यात आली. याप्रकरणी नरहरी आणि इतरांविरूध्द खून, कट रचणे, पुरावा नष्ट करणे यासह इतर कलामांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्याची सुनावणी चालु होती.

याप्रकरणी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूत तर आरोपींतर्फे अ‍ॅड. एम.आय. कुरापाटील, अ‍ॅड. ए.ए. इटकर आणि अ‍ॅड. ए.एन. शेख यांनी काम पाहिले. अंगावर शहारे येण्यासारखे कृत्य करणार्‍या नरहरी, विनोदा, महादेवी आणि अंबुबाई हिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर त्यांना मदत करणार्‍यांना ५ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like