विषारी दारूकांड : उच्च न्यायालयाने ‘या’ बड्या आरोपीला दिला दिलासा, पुरावा नसल्याने अटकपूर्व जामीन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पांगरमल विषारी दारूकांड प्रकरणी ‘सीआयडी’ने मोक्कांतर्गत गुन्ह्यात आरोपी केलेला शहरातील नामांकित ‘सिंग रेसिडेन्सी’ हॉटेलचे मालक सुरजितसिंग गंभीर यांची मुंबई उच्च न्यायालयाने ‘मोक्का’त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यांच्याविरोधात कुठलाही ठोस पुरावा नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. हा आदेश सीआयडीला मोठा धक्का मानला जात आहे.

फेब्रुवारी 2017 मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारादरम्यान पांगरमल येथे विषारी दारूने नऊ जणांचे बळी गेले होते. तसेच जिल्ह्यात एकूण 14 जणांचा मृत्यू झाला होता. या दारूचे उगमस्थान सिव्हिल हॉस्पिटल मधील कॅन्टीन होती. कॅन्टीनचा ठेका सन 2011 मध्ये सुरजित सिंग गंभीर यांच्या नावाने होता. त्यामुळे त्यांनाही या गुन्ह्यात सीआयडीने आरोपी केले होते. गंभीर यांच्याविरुद्ध मोक्का अन्वये कारवाई करण्यात आली होती. परंतु 2013 नंतर गंभीर यांचा त्या कॅंटीनशी संबंध असल्याची कुठलाही पुरावा उपलब्ध नाही, असे असताना त्यांना विनाकारण या गुन्ह्यात गोवल्याने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मोरे व न्यायमूर्ती भारती डोंगरे यांच्या पीठासमोर सुनावणी झाली.

न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर गंभीर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. हा आदेश राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला मोठा धक्का मानला जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –