वादग्रस्त फेसबुक पोस्ट टाकणार्‍या भाजपा पदाधिकार्‍याला एक दिवसाची पोलीस कोठडी

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – फेसबुक वरून आ. बाबाजानी दुर्रानी यांच्या बद्दल अपशब्द वापरत तसेच ‘मुस्लिम’ समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या वरून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्या विरुद्ध पाथरी येथे पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने फिर्याद दिल्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला. सोमवार (6/जुलै ) रोजी दुपारी आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

भारतीय जनता पक्षाचा तालुका उपाध्यक्ष असलेल्या बाळू कोल्हे पाटील याने ( 3/जुलै ) रोजी त्याच्या फेसबुक वरून वैचारिक पातळी ओलांडत आ. बाबाजानी दुर्रानी यांच्याविषयी बेजबाबदारपणे फेसबुकवर पोस्ट केली होती. तसेच धार्मिक भावना दुखावतील असा मजकूर समाविष्ट केला. पाथरी येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक शेख इरफान यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध शुक्रवारी रात्री पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

गुन्हा दाखल झाल्याने आरोपीला तपासकामी ताब्यात घेण्यात आले. प्रासंगिक मार्गाने; दुर्लक्ष करून पोस्ट टाकल्याने भाजपा पदाधिकाऱ्याला प्रकरण भवले मंगळवार, (7 जुलै ) रोजी पाथरी येथील न्यायालयात हजर केले असता बाळू कोल्हे पाटील याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक डॉ.मनोज आहिरे हे करीत आहेत.