पूर्व वैमनस्यातून खुन करणाऱ्यास जन्मठेप

खामगाव : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्वीच्या भांडणाच्या रागातून मुलाला मारत असताना मध्ये पडलेल्या वडिलांच्या पोटात चाकू खुपसून त्यांचा खुन केल्याबद्दल सत्र न्यायालयाने एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी हा महत्वपूर्ण निकाल दिला.

गजानन विश्वनाथ काकडे (रा. वरवट बकाट, खामगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. शिवलाल राठोड (रा. पिंपळगाव राजा) यांचा मृत्यु झाला होता. ही घटना ७ मे २०१३ रोजी घडली होती. गजानन काकडे हा सुनिल राठोड यांच्या घराकडे घटनेच्या ७ ते ८ दिवस अगोदर चकरा मारत होता.७ मे रोजी सुनिल राठोड हे संजय चव्हाण यांच्या घराकडे जात होते. त्यावेळी गजानन काकडे हा त्यांचा पाठलाग करत होता. त्यावेळी सुनिल याचे मोठे बाबा शिवलाल राठोड हे मध्यस्थी करण्यासाठी आले. तेव्हा काकडे याने त्यांच्या पोटात चाकू खुपसला आणि तेथून पळून गेला. शिवलाल राठोड यांना जखमी अवस्थेत औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले. उपचार सुुरु असताना ८ मे रोजी त्यांचा मृत्यु झाला. गजानन काकडे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली.

या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकिल रजनी बावस्कार (भालेराव) यांनी १७ साक्षीदार तपासले. वैद्यकिय अधिकारी डॉ. अतुल वनारे, डॉ. विकास राठोड व आरोपीस तपासणारे डॉ. अरूण पानझाडे तसेच शिवलाल राठोड यांचा मृत्यूूपुर्व जबाब नोंदविणारे नायब तहसिलदार आनंद बोबडे आणि साक्षीदार संजय चव्हाण, फिर्यादी सुनिल यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.

गजानन काकडे याच्याविरुद्ध दोषारोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने आजन्म कारावास व एक हजार रुपये दंड न भरल्यास २ महिने सश्रम कारावास तर, कलम ५०६ नुसार एक वर्ष सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंडांची शिक्षा सुनावली आहे.

सुंदर आणि ग्लोइंग त्वचा हवीये.. ‘या’ टिप्स वापरून घरी पण घेऊ शकता स्पा

वजन कमी करण्यासाठी खा ‘ही’ फळभाजी

पोटाच्या समस्या कधीच होणार नाहीत, जर सांभाळल्या ‘या’ आठ गोष्टी

ऑफिसमध्ये बसूनही करता येतील व्यायामाचे हे प्रकार