छगन भुजबळांसह ३५ जणांना कोर्टाकडून दिलासा, ६ सप्टेंबरपर्यंत जामीन मंजूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि यांच्यासह ३५ जणांना ‘पीएमएलए’ कोर्टाने तात्पुरता दिलासा दिला आहे. ईडीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राच्या प्रकरणी ६ सप्टेंबरपर्यंत छगन भुजबळांसह इतरांना वैयक्तिक हमीवर तात्पुरता जामीन मंजूर केला. दरम्यान,आज भुजबळ  यांची न्यायालयीन सुनावणी होती त्याकरिता कोर्टात जात असताना अचानक छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे छगन भुजबळ आज न्यायालयात हजार राहू शकले नाहीत,असे सुनावणी दरम्यान त्यांच्या वकिलांनी सांगितले.

आज या प्रकरणाचा निकाल देताना  कोर्टाने स्पष्ट  केले की , नाशिक येथील छगन भुजबळ यांची २५ कोटींची संपत्ती नव्याने जप्त केल्या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करता येणार की नाही याविषयी मुंबईतील पीएमएलए कोर्ट ६ सप्टेंबरला निर्णय होईल.

[amazon_link asins=’B00QNMVU6C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cc09a3dc-994f-11e8-a1d1-4dbfb55a4281′]

भुजबळ यांची नाशिक येथील २५ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. त्याच्या आधारे ईडीने पीएमएलए कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीने हे पुरवणी आरोपपत्र दाखल केले  असून त्याचा विचार स्वतंत्र गुन्हा असा करता येणार नाही असा बचाव छगन भुजबळ यांच्या वतीने करण्यात आला.

या प्रकरणात नवी माहिती आल्यावर प्रत्येक वेळी जामीनाकरता बाँड देणे कायदेशीररित्या योग्य ठरणार नाही, असाही भुजबळांच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. तसेच एकाच गुन्ह्याकरता दोनदा अटक करता येणार नाही, कायद्याच्या मूलभूत तत्वाचीदेखील आठवण भुजबळांच्या वकिलांनी कोर्टाला करुन दिली.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c0d1057b-994f-11e8-809b-fd3691c9d3b8′]
ईडीने आपण पुरवणी आरोपपत्र दाखल केल्याचे  मान्य केले.पण त्याची दखल वेगळा गुन्हा म्हणून करण्याची विनंती ईडीने कोर्टाला केली. यावर कोर्टाने 6 सप्टेंबरला या प्रकरणाचा निकाल देणार असल्याचे स्पष्ट करत तूर्तास भुजबळ कुटुंबीयांसहित इतर आरोपींनाही तात्पुरता दिलासा दिला आहे.

खालील लिंकच्या सहाय्याने पोलीसनामाचे फेसबूक पेज लाईक करा
https://www.facebook.com/policenama/