कोर्टानं ‘या’ मुलीसाठी दिला होता ‘वेगळा’ निर्णय, अश्लील कमेंटमुळं संपुर्ण देशात आली होती ‘चर्चेत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रांची येथे सोशल मीडियावर अश्लील भाष्य केल्यामुळे चर्चेत आलेली रिचा भारती कनिष्ठ न्यायालयातून कुराण वितरण करण्याच्या आदेशात अडकून पडली आणि झारखंड उच्च न्यायालयात अनेक पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी रिचाने न्यायालयाकडे दाद मागितली आहे.

पोलिसांविरोधात दाखल केली तक्रार
रिचाने अतिरिक्त पोलिस अधीक्षक, ग्रामीण पोलिस अधीक्षक आणि पिठोरिया पोलिस स्टेशन प्रभारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी विनंती केली आहे. फेसबुकवर अश्लील पोस्ट केल्याबद्दल 17 जणांविरूद्ध एफआयआर नोंदवावा अशी विनंतीही रिचाने न्यायालयाकडे केली आहे.

फेसबुकवर अनेकांनी केली होती अश्लील टिपण्णी
याचिकेत असे म्हंटले आहे की, रिचा यांच्या विरोधात फेसबुकवर अनेकांनी अश्लील कमेंट केल्या होत्या. याबाबतची तिने पोलिसांत तक्रार देखील केली होती. परंतु अनेक महिने होऊनसुद्धा तिच्या तक्रारीवर कारवाई केली जात नव्हती.

पोलिसांवर केले गंभीर आरोप
त्यांनी याचिकेत म्हंटले आहे की अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील कारवाई केली गेली नाही. रिच्या यांनी सांगितले की त्यांच्या फेसबुक वर कोणतीही चुकीची पोस्ट नव्हती आणि हलगर्जी पणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली आहे.

न्यायालयाने दिला अजिब निकाल
या वर्षी जुलै महिन्यात रिचावर सोशल मीडियावर आपत्तीजनक गोष्टी टाकल्याचा आरोप करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी रिचाला अटक देखील केली होती. कनिष्ठ न्यायालयाने रिचाला जामिनासाठी कुराण वाटपाची अट घातली होती. याचा अनेक संघटनांनी विरोध केला होता. त्यानंतर न्यायालयाने कुराण वाटपाची अट मागे घेतली होती.

 

visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like