दमानिया यांना न्यायालयाचा झटका; खडसे यांची बदनामी केल्याचा खटला रद्द करण्यास नकार

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर खोटे आरोप करुन त्यांची व भाजपची बदनामी केल्याप्रकरणी मुक्ताईनगर येथील न्यायालयात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात फौजदारी खटला दाखल आहे. हा खटला रद्द करावा, म्हणून दमानिया यांनी न्यायालयात दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a2df2d47-cea9-11e8-9b70-1fa3ef2e662e’]

मुक्ताईनगर येथील भाजप कार्यकर्ते रमेश ढोले यांनी मुक्ताईनगर न्यायालयात अंजली दमानिया यांच्याविरोधात आयपीसी ४९९, ५०० प्रमाणे खडसे यांची बदनामी केल्याबाबत फौजदारी खटला (क्र. १६५/१६) दाखल केला होता. हा खटला रद्द करावा, म्हणून अंजली दमानिया यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर फिर्यादी ढोले यांच्यातर्फे अ‍ॅड. व्ही. एच. पाटील व  अ‍ॅड. ए. आर. कांडेलकर यांनी तर दमानिया यांच्यातर्फे अ‍ॅड. खैरनार यांनी युक्तिवाद केला. या अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने दमानिया यांनी खटला रद्द करण्यासाठी दाखल केलेला अर्ज फेटाळून लावला.

[amazon_link asins=’B013GF4QQE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8975060b-ceaa-11e8-9866-859a12b84580′]

दरम्यान, या खटल्यात वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने अंजली दमानिया व प्रीती शर्मा मेनन यांच्याविरोधात ३० हजार रुपयांचे बेलेबल वारंट देखील जारी केले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अंजली दमानिया यांना मोठा झटका बसला आहे. दमानिया यांनी खडसे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले होते. जमिन प्रकरणात मंत्रिपद सोडावे लागल्यानंतरही खडसे यांच्यावर विविध प्रकारचे गंभीर आरोप करण्यात येत होते. यामध्ये अंजली दमानिया आघाडीवर होत्या.