अंकारा : वृत्तसंस्था – Court News | इस्लामिक देशांमध्ये महिलांनी पुरुषांविरूद्ध बोलणे एखाद्या गुन्ह्यासारखे आहे. तुर्की (Turkey) च्या एक महिला सामाजिक कार्यकर्तीला केवळ यासाठी पाच महिन्यांचा कारावास सुनावण्यात आला, कारण तिने पुरुषांबाबत एक ट्विट केले होते. कोर्टने सामाजिक कार्यकर्तीच्या ट्विटला पुरुषांचा अपमान मानले आणि तिला जेलमध्ये पाठवण्याची शिक्षा (Court News) सुनावली. मात्र, सामाजिक कार्यकर्तीचे म्हणणे आहे की, जे ट्विट तिचे असल्याचे म्हटले जात आहे ते तिने केलेलेच नाही.
वरच्या न्यायालयात धाव घेतली
‘डेली स्टार’च्या वृत्तानुसार, लेखिका आणि महिलांच्या अधिकारांसाठी काम करणार्या 34 वर्षीय पिनार यिलदिरिम (Pinar Yildirim) यांना पाच महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
त्यांना पुरुषांच्या अपमानात दोषी ठरवले आहे. पिनार यांनी याविरूद्ध वरच्या न्यायालयात (Court News) धाव घेतली आहे.
देशात सर्वच क्षेत्रात होतोय महिलांचा अपमान
जर त्या केस हरल्या तर त्यांना जेलमध्ये जावे लागेल. पिनार यांचे म्हणणे आहे की, देशात महिलांना प्रत्येक क्षेत्रात अपमानित केले जात आहे.
एका महिलेच्या ट्विटवरून जो गोंधळ सुरू आहे त्यावरून सर्वकाही समजते.
Tweet सोबत छेडछाड केल्याचा आरोप
पिनार यिलदिरिम यांनी दावा केला आहे की, त्यांच्या ट्विटची छेडछाड करण्यात आली आहे.
त्या म्हणाल्या की, मी कधी ‘आय डोंट लाईक मॅन’ लिहिलेले नाही. मी ट्विट केले होते ‘आय स्टिल लाईक मॅन’ जे बदलले आहे.
महिलांमध्ये संतापाचे वातावरण
ज्या ट्विटला पुरुषांचा अपमान समजून शिक्षा सुनावली ते माझे नाही आणि मी लवकरच ते सिद्ध करेन.
दरम्यान कोर्टाच्या या निर्णयाने महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यांचे म्हणणे आहे एका ट्विटसाठी जेलमध्ये पाठवणे अन्याय आहे.
समलैंगिकतेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप
सामाजिक कार्यकर्त्या पिनार यांनी सांगितले की, त्यांनी नेटफ्लिक्सवरील एका सीरीजबाबत ‘आय स्टिल लाइक मॅन’ असे ट्विट केले होते.
ज्यास रेडिओ अँड टेलिव्हिजन सुप्रीम कौन्सिलने समलैंगिकतेला प्रोत्साहन देणारे ठरवले.
मला आजही पुरुष पसंत
माझे हे ट्विट बदलून ‘आय डोंट लाईक मॅन’ करण्यात आले. मी अनेक गे चित्रपट, शो पाहिले, परंतु मी समलैंगिक तर झाले नाही.
मला आजही पुरुष पसंत आहेत आणि हिच बाब मी माझ्या ट्विटमध्ये नमूद केली होती.
न्यायालयांकडून होतोय भेदभाव
पिनारने म्हटले की, अलिकडेच कोर्टाने त्या तरूणांना शिक्षा देण्यास नकार दिला होता.
ज्याने एका महिला पत्रकारासोबत गैरवर्तन केले आणि तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. मग माझ्या प्रकरणात इतकी कठोरता का?
Web Title : Court News | activist jailed for tweeting i dont like men in turkey
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Facebook-META | मार्क झुकरबर्ग यांची मोठी घोषणा ! ‘Facebook’ चे नाव बदलले
Gold Silver Price Today | दिवाळीआधी खूशखबर ! सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या