‘SPPU’ च्या कुलगुरुंसह इतरांवर अ‍ॅट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भोजनगृहात वारंवार आळ्या निघत असल्यामुळे विद्यार्थ्याकडून आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी विद्यार्थ्यांनी पुणे न्यायालयात कुलगुरु नितीन करमळकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने कुलगुरू आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश चतु:श्रृगी पोलिसांना दिले आहेत. हा आदेश जिल्हा न्यायाधिश आणि अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस.आर. तांबोळी यांनी दिला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऱिफेक्टरी (भोजनगृह) मध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. यावर कारवाई करण्याऐवजी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की व मारहाण केल्याची तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडून चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पत्रकारांसह बारा विद्यार्थ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांवर अन्याय कारकपणे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांकडून बोलले जात होते. त्यानंतर गुन्हा दाखाल करण्यात आलेला विद्यार्थी आकाश भोसले आणि इतरांनी याविरोधात पुणे न्यायालयातमध्ये धाव घेतली.

विद्यापीठाचे कुलगुरु नितीन करमळकर, रजीस्ट्रार प्रफुल्ल पवार, संजय चाकणे, सुरक्षा विभागाचे प्रमुख सुरेश भोसले, भुरसींग राजपूत व इतरांच्या विरोधात ही तक्रार करण्यात आली होती. त्या नुसार न्यायालयाने सुनावणी दरम्यान या सर्वांवर अ‍ॅट्रोसीटी कायदा व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून चतुश्रृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती तक्ररदारांचे वकील अ‍ॅड. तौसिक शेख यांनी दिली.

मल्हार सेना आपणास महाराष्ट्रात फिरू देणार नाही : राष्ट्रवादी’च्या प्रदेशध्यक्षांना इशारा

मागास वर्गीय विद्यार्थ्यांचा भोजन व निवासाचा खर्च शासन उचलणार

‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा