भाजप आमदार संगीता ठोंबरेंसह पतीवर गुन्हा दाखल करून चौकशी करा : न्यायालयाचा आदेश

बीड : पोलीसनामा ऑनाइन – केज येथील भाजप आमदार संगीता ठोंबरे आणि त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांच्या विरोधात फसवणुकीसह इतर गुन्हे दाखल करून चौकशी करून अहवाल न्यायालयात सादर कण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केज न्यायालयाने बुधवारी (दि.११) हे आदेश दिले आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सुतगिरणीच्या संचालक पदावर नेमणूकीसाठी आपल्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याची फिर्य़ाद गणपती कांबळे यांनी न्यायालयात केली होती.

गैर व्यवहारात आपल्या खोट्या सह्या चेअरमन व केजच्या आमदार यांनी करून शासनाची व जनतेची फसवणूक करून आपणास नाहक गोवण्यात आले आहे. आर्थिक व्यवहारात आपला काही एक संबंध नसून पुराव्या दाखल त्यांनी आपल्या खोट्या सह्या केल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. भाजप आमदार संगीता ठोंबरे या सुतगिरणीच्या मुख्य प्रवर्तक आहेत. तर त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे हे या सुतगिरणीचे अध्यक्ष आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार आमदार संगीता ठोंबरे व चेअरमन विजयप्रकाश ठोंबरे यांच्यावर 420, 467,468,471 कलमा नुसार बनावट दस्तऐवज तयार करून ते माहिती असतानाही खरे दाखवून फसवणूक केली असल्याचे गुन्हे दाखल करून चौकशी करून न्यायालयात चार्जशीट दाखल करण्याच आदेश देण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. संतोष मुंडे यांनी दिली आहे.