मैत्री अन् प्रेमाखातर ‘तो’ लिंग ‘परिवर्तन’ करून बनला ‘ती’, लग्नानंतर घटस्फोट झाल्यावर न्यायालयानं दिला ‘पोटगी’चा आदेश

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – मैत्रीतून प्रेमाखातर एका तृतीयपंथीयाने लिंग परिवर्तन करुन तो चा ती झाला. त्याने पुरुषाबरोबर विवाह केला. काही दिवसातच त्यांच्यात वाद झाल्याने त्याने घटस्फोट घेऊन दुसरा विवाह केला. तेव्हा तिने न्यायालयात दावा केला. ‘तो’ आता ‘ती’ झाल्याने तिला महिला असल्याने मान्य करुन न्यायालयाने तिला दरमहा १२ हजार रुपयांची पोटगी देण्याचा आदेश बारामती येथील न्यायालयाने दिला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्र. न. देशपांडे यांनी हा निर्णय दिला.

बारामती येथील एका तृतीयपंथीयाची एका पुरुषाबरोबर मैत्री होती. या मैत्रीतून त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी एकमेकांसोबत आयुष्य घालविण्याच्या शपथा घेतल्या. त्यामुळे या तृतीयपंथीने १ जुलै २०१६ रोजी लिंगपरिवर्तन करुन तो चा ती झाला. त्या दोघांनी २१ जुलै २०१६ रोजी विवाह केला. त्यांचा संसार सुरु झाल्यावर काही दिवसांनी त्यांच्यात वाद होऊ लागले. पतीचे कुटुंबीयही तिला त्रास देऊ लागले. काही काळाने त्याने तिला घटस्फोट दिला व दुसरे लग्न केले. आता काही काम नसल्याने तिच्यावर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर तिने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला. त्याचवेळी तिने कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली न्यायालयात धाव घेऊन अंतरिम पोटगीची मागणी केली.

न्यायालयात खटला उभा राहिला, तेव्हा पतीच्या वकिलाने संबंधित महिला ही मुळची तृतीयपंथी असल्याने कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत तिला अर्ज करता येत नसल्याचा दावा केला. त्यावर तिच्या वकिलाने युक्तीवाद केला की, त्याने लिंगपरिवर्तन केल्याने आता त्याचे तीमध्ये रुपांतर झाले आहे. आता ती महिला असल्याने तिला कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली दाद मागता येऊ शकते.

दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी देशपांडे यांनी तिचा दावा मान्य करुन दरमहा १२ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश पतीला दिला आहे. या निकालाने लिंगपरिवर्तन करुन ‘तो’ चा ‘ती’ झालेल्या अनेकांना पुढे विवाहात काही अडचणी आल्या तर ते पोटगी मागू शकणार आहेत.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like