शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ‘हे’ 3 आमदार अडचणीत, ‘या’ प्रकरणी न्यायालयाकडून ‘दणका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असताना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला एक मोठा धक्का बसल्याची घटना घडली आहे. संख्याबळ जमवणे सध्या शिवसेना भाजपसाठी आवश्यक असताना राष्ट्रवादीचे विद्यमान 2 आमदार, काँग्रेसचे 2 माजी मंत्री आणि शिवसेनेचा 1 आमदार अडचणीत आले आहेत. या नेत्यांना 12 कोटी रुपयांच्या साखर घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने दणका दिला आहे.

हा घोटाळा निफाड साखर कारखान्यात 2007 साली झाला होता. त्यानंतर तत्कालीन 24 संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या 24 संचालकांमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे तर शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप, काँग्रेसचे माजी मंत्री शोभा बच्छाव आणि तुकाराम दिघोळे यांचा समावेश आहे.

भाजपमधून बंडखोरी करत माणिकराव कोकाटे यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर विधानसभा निवडणूकीला त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यात ते विजयी झाले. परंतू न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आता ते अडचणीत आले आहेत.

सत्तास्थापनेवरुन राज्यात गोंधळ सुरु असताना प्रत्येक पक्षासाठी त्यांचा आमदार महत्वाचा आहे. परंतू आता न्यायालयाने विद्यमान आमदारांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी हा धक्का मानला जात आहे.

राज्यातील राजकीय घडामोडींना आज वेग आला आहे. जनतेनं भाजप-शिवसेना महायुतीच्या बाजूने कौल दिल्याने त्यांनी सत्ता स्थापन करावी अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली होती पंरतू भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडीसाठी आजचा दिवस महत्वाचा असणार आहे.

Visit : Policenama.com