Pune Wall Collapse : बिल्डर व्होरा, शहा आणि गांधींचा अटकपुर्व जामिन फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन : कोंढवा येथे सीमाभिंत कोसळून १५ बांधकाम कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी कांचन हाऊसिंग कंपनीचे भागिदार पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मीकांत गांधी यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. मात्र, अतिरिक्त सत्र न्यायाधिश एस.एम. देशपांडे यांनी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

कामगारांच्या मृत्यूप्रकरणी आल्कन स्टयलस आणि कांचन हाऊसिंग या दोन्ही इमारतीच्या बांधकाम व्यावसायिकांवर सदोश मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर अल्कान स्टाययलसचे विवेक अगरवाल आणि विपुल अगरवाल यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, आज त्यांना मिळेलेली पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत ६ जुलैपर्यंत वाढ केली.

या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून या समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी तपासात सहकार्य़क करण्यास तयार असून जामीन मिळावा अशी मागणी केली. बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. श्रीकांत शहा, सुधीर शहा, नंदिनी देशपांडे, निलिमा वर्तक यांनी बाजू मांडली.

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी सेवन करा, आरोग्य सुधारेल

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

बुद्धविहार तसेच उर्वरित रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार

आदिवासींसाठी स्वतंत्र आरोग्य संस्था असायला हवी