आरोपी विनोद चिंचाळकर याचा जामीन न्यायालयाने फेटाळला

भोकर | पोलीसनामा आॅनलाईन – (माधव मेकेवाड) आरोपीला जामीन मिळेल यासाठी भोकर प्रतिष्ठित व नगरपरिषदेचे अनेक आजी माजी कर्मचारी न्यायालयाच्या भागात होते, परंतु न्याय देवतेने अचूक न्याय देऊन अनेकांच्या चेहऱ्यावर घाम फोडला.

पोलिसांना चुकांडा देऊन आज पर्यंत पसार असलेला नगर परिषद नोकर भरतीतील मुख्य आरोपी विनोद चिंचाळकर पोलिसांना स्वतः होऊन शरण आल्यानंतर जामीन मिळेल अशी आशा सर्व भोकरच्या नागरीकांत होती. पण न्यायालयात सरकारी वकील पांडे यांनी दिलेल्या सबळ पुराव्या अभावी जामीन टाळला गेला. संजय बंशी पवार या आरोपीला मात्र जामीन मिळाला आहे.

सविस्तर माहिती अशी की, भोकर नगर परिषदेत २०१५ च्या कार्यकाळात बोगस नोकर भरती करण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर आणि नगराध्यक्षांनी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने डाव रचून लक्षावधी रूपयांचा आर्थिक फायदा करुन घेतला. हा भ्रष्टाचारी कारभार चव्हाट्यावर आणत शाहिद प्रफुल्ल नगर प्रभाग क्र. १३ च्या नगरसेविका अरूणा विनायक देशमुख यांना अनेकदा गुन्हेगार अधिकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडे पायपीट करावी लागली परंतु सर्व काही निष्फळ झाल्याने शेवटी मा.न्यायालयांतून गुन्हा नोंदवावा लागला.

अशा भ्रष्टाचारी गुन्हेगारी प्रवृतीच्या आरोपीला पोलीस मोकाट सोडत असतील तर सामान्य जमतेच काय? सामान्य जनतेमध्ये असा प्रश्न निर्माण होत होता. पण त्यांच्या अटकेने सर्व जनतेमध्ये खुशीचे वातावरण आहे. भोकर न्यायालयाने त्यांना एक दिवसीय पी. सी. आर. दिल्यानंतर त्या आरोपींना  न्यायांलयात हजर केले असता सरकारी वकील व आरोपी यांचे वकीलांमध्ये चाललेली बहेस मा. न्यायाधीश यांनी लक्षात घेऊन त्या आरोपी पैकी एकास जामीन दिला व मुख्य आरोपीस मात्र जामीन न देता (एम.सी.आर) केले आहे.

भोकर तालुक्यातील नागरिकांचे उर्वरित तीन आरोपिकडे लक्ष वेधले आहे. मुख्य आरोपी असलेल्या विनोद चिंचाळकर यांना जामीन कधी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे. यावेळी भोकर न्यायालयात तुडुंब गर्दी जमलेली होती.