‘त्या’ प्रकरणात चार पोलीस तडकाफडकी निलंबित

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्य़ालयातील चोरीचे प्रकरण चार पोलिसांना भोवले आहे. या प्रकरणात चार पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांच्या निलंबनाचे आदेश सोमवारी (दि.२६) पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी काढले आहेत. पोलिसांच्या निलंबनामुळे जळगाव पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोलीस हवालदार राजेंद्र भिका चव्हाण, पोलीस प्रवीण शंकर वाघ, राजेंद्र प्रताप दोडे व राहूल अरुण पारधी या चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी चौघांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेले चौघेजण घटनेच्या दिवशी जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात ड्युटीला होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे यांच्या कार्यालयात ३ ऑगस्टच्या रात्री चोरट्यांनी रोख रक्कम हाती न लागल्याने बाथरुममधील नळ चोरुन नेले होते. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. या घटनेची चौकशी झाली होती. त्यात ड्युटीवर असलेल्या चार कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न झाले होते.

आरोग्यविषयक वृत्त –