बडतर्फ पोलिस शैलेश जगतापला न्यायालयानं सुनावली पोलिस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मालकीहक्क नसताना शहरातील विविध ठिकाणी जमीन विक्रीस उपलब्ध असल्याचे सांगत 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात बडतर्फ पोलिस शैलेश जगताप आणि प्रकाश फाले यांना न्यायालयाने दोन दिवस (23 जुलैपर्यत) पोलिस कोठडी सुनावली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर केले होते. तर यातील महिला फरार आहे.

सत्यभामा पोपट चांदगुडे (वय 40, रा. घरकुल, चिखली) यांनी याबाबत खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शैलेश जगताप, प्रकाश फाले व मीना कंजानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कंजानी हिचा पोलिस शोध घेत आहेत.

तर जगताप व फाले यांना काल अटक केली होती. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. जगताप याने चांदगुडे यांना उंड्री येथील जमीनीवर त्याचा मालकीहक्क नसताना त्याचे साथीदार फाले, कंजानी यांनी उंड्री, औंध येथे जागा विक्रीस उपलब्ध असल्याचे त्यांना सांगितले. त्यासाठी त्यांनी चांदगुडे यांच्याकडून 20 लाख रुपये घेतले. व्यवहार झाल्यानंतर चांदगुडे यांना जमीन मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी जगतापकडे त्यांचे पैसे मागितले. तेव्हा त्यांना “पैसे मागितले तर गुन्हात अडकवेल,” अशी धमकी जगतापने दिली होती, असे फिर्यादीत नमूद आहे.