महाराष्ट्र : रेप केसमधील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पोलिस स्टेशन सजवण्यात आलं नवरी सारखं

बुलढाणा : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील बुलढाणा येथे एक वर्षापूर्वी एका निरागस मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. गुरुवारी बुलढाण्याच्या विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणात दोन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. कोर्टाच्या निर्णयानंतर चिखली पोलिस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी एखाद्या नवरीप्रमाणे संपूर्ण पोलिस ठाणे सजवले आणि फटाके फोडले.

वास्तविक चिखली शहरात २६ एप्रिल २०१९ च्या रात्री दोन तरुणांनी एका ९ वर्षाच्या निरागस मुलीवर अमानुषपणाचे कृत्य केले. पीडिता तिच्या पालकांसह झोपली असता, तिला दोन तरुणांनी शहरातील एका निर्जन जागी नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता.

पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी सागर विश्वनाथ बोरकर आणि निखिल शिवाजी गोलाइत या दोघांवर बलात्कार, पॉक्सो आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या भयंकर गुन्ह्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाचे वातावरण होते. चिखली शहरात आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी नागरिकांनी मोर्चे काढले आणि एक दिवस शहरही बंद केले होते.

या बलात्कार प्रकरणात गुरुवारी झालेल्या अंतिम सुनावणीत दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाबाहेर कडक पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता.

या घटनेनंतर वैद्यकीय तपासणी करणार्‍या महिलेने सांगितले की, औरंगाबादमध्ये पीडित मुलीचे दोन मोठे ऑपरेशन करण्यात आले. अशी घटना कधीही कोणासोबत घडू नये अशी त्यांची प्रार्थना असल्याचे या महिला पोलिस कर्मचाऱ्याने सांगितले.

चिखली पोलिस ठाण्याचे निरीक्षक गुलाबराव वाघ यांनी सांगितले की, पीडितेच्या आईचे मानसिक संतुलन ठीक नाही. चिखली पोलिसांच्या सर्व कर्मचार्‍यांनी या पीडित कुटुंबाला शक्य ती मदत केली. कोर्टाने आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्याच्या आनंदात चिखली पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी नवरीप्रमाणे पोलिस ठाणे सजवले व फटाके फोडले. असे म्हटले जात आहे की, भारताच्या इतिहासातील हे पहिलेच पोलिस स्टेशन असेल, ज्यांनी आरोपींना शिक्षा झाल्यावर स्टेशन लाईट्सने सजावट करुन फटाके फोडले गेले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like