धक्कादायक ! रक्षाबंधनाच्या दिवशीच 16 वर्षाच्या चुलत बहिणीवर भावाकडून बलात्कार, पिडीतेने उचलले ‘हे’ पाऊल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमधील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी या मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी मुलीची आई माहेरी गेलेली असताना या मुलीच्या चुलत भावाने तिच्यावर बलात्कार केला. अत्याचार झाल्यानंतर त्या मुलीने आपल्या काकाच्या कुटुंबियांना याविषयी सांगितले असता त्यांनी तिलाच दोषी ठरवले. त्यामुळे नाराज झालेल्या मुलीने संध्याकाळी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून दिला असून आरोपी भावाला अटक कार्याचे प्रयत्न सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलीच्या मामाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार या चुलत भावाने तिला अंगाला साबण लावण्याच्या बहाण्याने आतमध्ये बोलावून तिच्याबरोबर हे दुष्क्रुत्य केले. यावेळी आरोपी मुलगा नशेमध्ये होता, असेदेखील सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांना अद्याप कोणतीही लिखित तक्रार मिळाली नसून पोस्टमोर्टमनंतर या मुलीच्या मृत्यूची अधिक कारणे समोर येतील.

You might also like