नाशिक जिल्ह्यासाठी कोव्हॅक्सीन लस उपलब्ध करावी- सचिन होळकर

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  नाशिक जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोना लसीकरण सुरू आहे जिल्ह्यातील अनेक खाजगी तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होती अनेकांनी या लसीचा पहिला डोस घेतला आहे आज मात्र जिल्ह्यात या लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

त्यामुळे दुसरा बूस्टर डोस घेण्यासाठी अनेकांना प्रतीक्षा करावी लागत आहे किंवा इतरत्र जावे लागत आहे ही अडचण लक्षात घेता किमान दुसरा डोस मिळण्यासाठी कोव्हॅक्सिन ही लस जिल्ह्यात सर्वत्र उपलब्ध करून द्यावी यासाठी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस सचिन आत्माराम होळकर यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांना नुकतेच ई-निवेदने सादर करून दूरध्वनी वरुन देखील संपर्क साधला. हि लस तात्काळ उपलब्ध न करून दिल्यास अनेकांना दुसऱ्या बूस्टर डोस पासून वंचित राहावे लागणार आहे ही लस उपलब्ध होईपर्यंत वरिष्ठांकडे पाठपुरावा केला जाईल असे सचिन होळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले..