COVAXIN च्या आपत्कालीन वापराला अखेर WHO ने दिली मंजूरी, मोठ्या कालावधीपासून प्रलंबित होते प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था COVAXIN | दिवाळीपूर्वी एक चांगली बातमी आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चे तांत्रिक सल्लागार गटाने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला (COVAXIN) आपत्कालीन वापराची मंजूरी देण्याची शिफारस केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक गटाकडून ही शिफारस केवळ 18 वर्षावरील लोकांसाठी करण्यात आली आहे.

 

जागतिक आरोग्य संघटनेकडून भारत बायोटेकची कोरोना व्हॅक्सीन कोव्हॅक्सीन (Covaxin) ला अजूनपर्यंत मंजूरी मिळाली नव्हती.
हे प्रकरण मोठ्या कालावधीपासून प्रलंबित होते. सरकारी सूत्रांनी सांगितले की, केवळ 18 वर्षावरील मुलांसाठी स्वीकृतीसाठी अर्ज करण्यात आला होता. बालकांसाठी अर्ज करण्यात आला नव्हता.

 

WHO ने मागील महित दिले होते स्पष्टीकरण

 

जागतिक संघटनेकडून कोव्हॅक्सीनला मंजूरी देण्यात होत असलेल्या विलंबावरून मागील महिन्यात ऑक्टोबरमध्ये मोठे वक्तव्य समोर आले होते.
ज्यामध्ये WHO चे म्हणणे होते की, आता त्यांना भारत बायोटेककडून कोव्हॅक्सीनबाबत आणखी माहितीची आवश्यकता आहे.
जेणेकरून व्हॅक्सीनला आपत्कालीन वापरासाठी (Emergency Use) मंजूरी देण्यापूर्वी तिचे चांगल्याप्रकारे मूल्यांकन करता यावे.
भारत बायोटेकला मोठ्या कालावधीपासून कोव्हॅक्सीनला WHO ची मंजूरी मिळण्याची प्रतिक्षा होती.
हैद्राबाद येथील भारत बायोटेकने 19 एप्रिलला कोव्हॅक्सीनशी संबंधित टेटा संघटनेकडे सोपवला होता.

 

कोव्हॅक्सीनला मंजूरी मिळण्यात होत असलेल्या विलंबाबत 18 ऑक्टोबरला WHO ने एक ट्विट केले ज्यामध्ये त्यांच्याकडून म्हटले होते की,
कोव्हॅक्सीनला मंजूरी मिळण्याची प्रतिक्षा अनेकजण करत आहेत.
परंतु कोणत्याही व्हॅक्सीनला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यापूर्वी आम्हाला हे मूल्यांकन करणे आवश्यक असते की ती सुरक्षित आणि प्रभावी आहे किंवा नाही.

जागतिक आरोग्य संघटनेने हे सुद्धा सांगितले की, कोव्हॅक्सीनबाबत भारत बायोटेक कंपनी सातत्याने डेटा पाठवत आहे, ज्याचे मूल्यांकन केले जात आहे. (COVAXIN)

 

Web Title : covaxin | covid 19 technical advisory group of who recommends emergency use listing status for bharat biotech covaxin sources

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Parambir Singh | अखेर परमबीर सिंग ‘अवतरले’, अनिल देशमुखांबद्दल केला ‘हा’ मोठा खुलासा

Modi Government | मोदी सरकारकडून सर्वसामान्यांना दिवाळी भेट ! इंधनावरील टॅक्स घटवला, पेट्रोल 5 रूपयांनी तर डिझेल 10 रूपयांनी ‘स्वस्त’

Pune Crime | पोलिस कर्मचार्‍याकडून शारीरिक व मानसिक त्रास ! WhatsApp व्दारे सुसाईट नोट पाठवून महिला पोलिसाची आत्महत्या, प्रचंड खळबळ