स्वदेशी Covaxin ‘कोरोना’वर 60 % प्रभावी, कंपनीचा दावा, देशाला लवकरच खुषखबर मिळणार

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे.कोरोना या विषाणूवर परिणामकारक ठरेल अशी लस बनविण्याचे प्रयत्न ब्रिटन, अमेरिका आणि रशियासह अनेक देशांतील कंपन्या करत आहेत. हैदराबादमधील भारत बायोटेकसुद्धा त्यापैकीच एक आहे. या कंपनीकडून कोव्हॅक्सिन (covaxin) विकसित केले जात आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. भारतात तयार झालेली कोव्हॅक्सिन ही लस कोरोनाविरोधात 60 टक्के प्रभावी (The covaxin is 60 percent effective) असल्याचा दावा ही लस निर्माण करत असलेल्या कंपनीचे अध्यक्ष साई डी. प्रसाद यांनी केला आहे. कोव्हॅक्सिन ही भारताची स्वदेशी कोरोना लस( covaxin is an indigenous corona vaccine from India) आहे. ही लस भारत बायोटेकने आयसीएमआर आणि नॅशनल इंस्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी यांच्या सहकार्याने विकसित केली आहे.

याबाबत भारत बायोटेकचे अध्यक्ष साई डी प्रसाद म्हणाले की, कोव्हॅक्सिन कोविड-19 विषाणूविरोधात किमान 60 टक्के प्रभावी राहील. डब्ल्यूएचओ, अमेरिकेची एफडीए आणि भारताची केंद्रीय ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनसुद्धा जर कुठलीही रेस्पिरेटरी व्हॅक्सिन 50 टक्के प्रभाव दाखवत असेल तर तिला मंजुरू देता. आमचे लक्ष्य किमान 60 टक्के प्रभावी लस विकसित करण्याचे आहे, मात्र तिचा प्रभाव अधिकही असू शकतो, असे प्रसाद यांनी सांगितले आहे. कोव्हॅक्सिनच्या स्टोरेजसाठी 2 ते 8 डिग्री तापमानाची गरज भासणार आहे.सध्या भारत बायोटेककडे तीन कोटी डोस निर्माण करण्याची क्षमता आहे. ही क्षमता पुढच्या वर्षी वाढवून पन्नास कोटी करता येईल. मात्र कंपनीने लसीच्या किमतीची माहिती दिलेली नाही.