COVID-19 : देशात प्रथमच Covaxin चं मानवी परिक्षण, तरूणाला दिला पहिला डोस

पाटना : पोलीसनामा ऑनलाइन –  सध्या देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोनाच्या लसीची अनेकांना प्रतीक्षा आहे. सध्या विविध पर्यायांचा उपयोग करीत कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

देशात पहिल्यांदा पाटन्याच्या एम्स रुग्णालयात कोरोना विषाणू लसीचे मानवी चाचणीस सुरुवात केली आहे. पाटन्यातील एम्सच्या विशेष टीमने 30 वर्षीय तरुणावर हे ट्रायल केले असून त्याला ‘हाफ एमएल डोस दिला आहे. लस दिल्यानंतर तब्बल 4 तासांपर्यंत त्याला निरीक्षणाखाली ठेवले होते. त्यानंतर त्याला घरी पाठविण्यात आले आहे.

14 दिवसांनंतर पुन्हा त्याला दुसरा डोस दिला आहे. देशात आतापर्यंत अशा प्रकारचे ट्रायल कोणत्याही संस्थेत झाले नाही. पाटना एम्सचे निर्देशक प्रभात कुमार सिंह यांनी सांगितले की, आतापर्यंत 18 जणांची चाचणी केली होती. ज्यामध्ये 8 जणांना डोस दिला असून आणखी काही जणांना हा डोस दिला जाणार आहे.

पाटना एम्समध्ये देशात पहिल्यांदा कोरोनाविरोधातील युद्ध जिंकण्यासाठी मानवी चाचणी केली जात आहे.आतापर्यंत देशात अशा प्रकारचे ट्रायल कोणत्याही संस्थेत झालेलं नाही. देशात सर्वात पहिली चाचणी केल्यानंतर पाटना एम्सच्या तज्ज्ञांनी गुरुवारी 6 आणखी लोकांवर ट्रायल केले. सोमवार आणि मंगळवारी एकूण 18 लोकांची वैद्यकीय चाचणी केली होती. त्यापैकी बुधवारी एकावर ट्रायल घेतली असून गुरुवारी 6 लोकांवर याची ट्रायल केली आहे. अशा प्रकारे पाटन्यात एकूण 50 जणांवर कोरोना लसीचे ट्रायल केले जात आहे.