COVID-19 : ‘खिलाडी’ अक्षयनं ‘या’ कामासाठी BMC ला पुन्हा दिले 3 कोटी !

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या पूर्ण देश कोरोना विरुद्ध लढण्यासाठी एकत्र आला आहे. बॉलिवूड स्टार अक्षय कुमार मदतीसाठी पुन्हा एकदा पुढे आला आहे. अक्षयनं यापूर्वीच पीएम केअर्स फंडात 25 कोटी डोनेट केले होते. यानंतर आता त्यानं पुन्हा एकदा बीएमसीला 3 कोटी रुपये डोनेट केले आहेत.

रिपोर्टनुसार, अक्षय कुमारनं हे 3 कोटी रुपये बीएमसीला पर्सनल प्रोटेक्टीव इक्वीपमेंट(PPE), मास्क आणि टेस्टिंग किट खरेदी करण्यासाठी डोनेट केले आहेत. एका इंग्रजी रिपोर्टनुसार, अक्षय कोणालाही काहीही न सांगता बीएमसीची मदत करत आहे.

बीएमसीचे जॉईंट म्युनिसिपल कमिशनर आशुतोष सलील म्हणाले, “काही दिवसांपूर्वीचं अक्षय कुमारसोबत बोलणं झालं होतं. मला आनंद आहे की, तो त्याच्याकडून पूर्ण योगदान देत आहे. अक्षयचा हा पैसा जनरल फंडात जाणार आहे. यातून आम्ही मास्क, ग्लव्स आणि रॅपिड टेस्टींग किट खरेदी करणार आहोत.”

अक्षय बीएमसी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक फोटो शेअर केला होता. या फोटोत त्यानं पोलीस, डॉक्टर, नर्स, एनजीओ, वॉलंटियर सरकारी कर्माचाऱ्यांना धन्यवाद दिले होते. फोटोत दिसत होतं की, तो हातात प्लेकार्ड घेऊन उभा आहे. यावर लिहिलं आहे, दिल से थँक्यू

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचा सूर्यवंशी हा आगामी सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाच रिलीज डेट टाळण्यात आली होती. याशिवाय तो आगामी लक्ष्मी बॉम्ब आणि अतरंगी रे या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.